मुंबई - उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर घटनेनंतर सर्वच क्षेत्रांमधून प्रतिक्रिया येत आहेत. राजकीय, सामाजिक तसेच प्रामुख्याने अर्थ आणि उद्योग क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. (Cyrus Mistry died in an accident) यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी 54 वर्षीय सायरस मिस्त्री यांच्या निधनावर ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.
सायरस टाटा समूहात सामील - 2006 मध्ये, जेव्हा सायरस मिस्त्री यांचे वडील निवृत्त झाले तेव्हा ते टाटा सन्सच्या संचालक मंडळात सामील झाले. रतन टाटा यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर डिसेंबर २०१२ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. सायरस मिस्त्री हे टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष होते. मात्र, ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांना पदावरून हटवण्यात आले. टाटा समूहातील अध्यक्षपदाचा कार्यकाळ बराच वादात सापडला होता. यानंतर एन चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.
मेस्त्री टाटा समूहाचे वाद - टाटा सन्समध्ये शापूरजी पालोनजी समूहाचा 18.37% हिस्सा आहे. सायरस मिस्त्री यांना 2012 मध्ये रतन टाटा यांच्या जागी टाटा सन्सचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. 2016 मध्ये त्यांना अचानक पदावरून हटवण्यात आले तेव्हा सायरस मिस्त्री यांचे टाटा समूहासोबत भांडण झाले होते. यानंतर, टाटा समूहाने टाटा सन्समधील एसपी समूहाचे स्टेक विकत घेण्याची ऑफर दिली होती, जी मिस्त्री कुटुंबाला मान्य नव्हती. यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि टाटांच्या बाजूने निर्णय आला.
टाटा मेस्त्री सोयरीक - टाटा आणि मिस्त्री यांचे व्यवसायिक संबंध संपूर्ण जगाला माहिती आहेत. पण, त्यांचे फक्त व्यावसायिक संबंध व्यतिरिक्त यांची सोयरीक देखील होती. पालोनजी शापूरजींच्या दोन्ही मुलांची नावे शापूर मिस्त्री आणि सायरस मिस्त्री आहेत, तर लैला आणि अल्लू या दोन मुली आहेत. पालोनजींची मुलगी अल्लू हिचा विवाह नोएल टाटा यांच्याशी झाला आणि त्यामुळे टाटा आणि मिस्त्री कुटुंब एकमेकांशी जोडले गेले. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत.
सायरस यांची संपत्ती - सायरस मिस्त्री यांचे वडील पालोनजी मिस्त्री हे देखील मोठे उद्योगपती होते. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, पालोनजी मिस्त्री यांनी त्यांच्या मृत्यूच्या वेळी ₹29 अब्ज पेक्षा जास्त संपत्ती कमावली होती, ज्यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2018 मध्ये सायरस मिस्त्री यांची वैयक्तिक संपत्ती 70,957 कोटी रुपये होती.
हेही वाचा - Cyrus Mistry: सायरस मिस्त्री यांच्याबद्दलच्या या पाच गोष्टी; वाचा सविस्तर