ETV Bharat / bharat

King Cobra : पिलीकुला पार्कमध्ये दोन जाळीदार अजगरांनी घातली 50 अंडी - पिलीकुला पार्कमध्ये दोन जाळीदार अजगरांनी घातली 50 अंडी

दोन जाळीदार अजगरांनी 50 अंडी घातली ( python hatches 50 eggs ) आहेत. पिलीकुला बायोलॉजिकल पार्क, मंगळुरू येथे या दोन अजगारांना ठेवण्यात आलं आहे.

King Cobra
King Cobra
author img

By

Published : Jul 15, 2022, 10:36 PM IST

मंगळुरू (दक्षिण कन्नड) - दोन जाळीदार अजगरांनी 50 अंडी घातली ( python hatches 50 eggs ) आहेत. पिलीकुला बायोलॉजिकल पार्क, मंगळुरू येथे या दोन अजगारांना ठेवण्यात आलं आहे. जाळीदार अजगर हा जगातील सर्वात लांब साप मानला जातो. हे साप 30 फूट लांब वाढतात. जाळीदार अजगर हा या प्रदेशातील दुर्मिळ साप आहे. ते बहुतेक अंदमान आणि निकोबार बेटांवर आढळतात.

पाच वर्षांपूर्वी चेन्नईतून 5 जाळीदार अजगर आणले होते. यापैकी काही अजगरांनी यापूर्वी अंडी घातली आहेत. त्यात आता 2 जाळीदार अजगरांनी 50 अंडी घातली आहे. ही अंडी आई अजगराने उबवली आहेत. त्यामुळे दोन दिवसांत या अंड्यातून पिल्ले बाहेर येण्याचा शक्यता आहे.

जाळीदार अजगर दुर्मिळ असल्याने त्यांच्या पिल्लांना जंगलात सोडले जात नाही. पिलीकुला बायोलॉजिकल पार्कचे संचालक एच. जयप्रकाश भंडारी म्हणाले की, प्राणी विनिमय योजनेंतर्गत गरज असलेल्या इतर प्राणीसंग्रहालयांना हे अजगर देण्यात येतील.

तसेच, डॉ. शिवराम कारंटा बायोलॉजिकल पार्क येथे कृत्रिम पद्धतेनुसार 38 किंग कोब्रा पिल्लांचा जन्म झाला आहे. सुल्यातील संपजे येथील आठ वर्षांची नागिनी आणि पिलीकुलामध्ये जन्मलेला 10 वर्षांचा नागेंद्र हे या पिल्लांचे पालक आहेत. नागिणीने येथील प्रजनन केंद्रात अंडी घातली. ती अंडी उष्ण करायला ठेवल्यानंतर 76 दिवसांनी पिल्ले बाहेर आली.

हेही वाचा - आता सरकारी कार्यालयांमध्ये फोटो, व्हिडीओ घेण्यास 'या' राज्याने घातली बंदी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.