ETV Bharat / bharat

विधानसभा निवडणूक निकाल : 'मीम्स'मधून उमटल्या लोकांच्या प्रतिक्रिया... - ममता बॅनर्जी मीम्स

Khela Hobe and other Memes trends on social media after the assembly election results
विधानसभा निवडणूक : राज्यांमध्ये मतांचा, तर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस..
author img

By

Published : May 3, 2021, 7:19 AM IST

07:03 May 03

हैदराबाद : चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. यात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी हॅट्रिक केलेली पहायला मिळाली. तर, दक्षिणेकडील राज्ये पुन्हा एकदा भाजपाला दूर ठेवण्यात यशस्वी होताना दिसले. निवडणुकीमध्ये मतांचा पाऊस पडला असला, तरी निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्सचा पाऊसही पहायला मिळाला. लोक आपल्याला काय म्हणायचं आहे, किंवा नेत्यांना आता काय वाटत असेल हे आपापली कल्पनाशक्ती लाऊन मीम्सच्या माध्यमातून सांगत होते. यांपैकी काही निवडक मीम्स पाहूयात...

07:01 May 03

खूब लढी मर्दानी वो..

Assembly Election Results MEmes
खूब लढी मर्दानी वो..

एकट्या ममतांनी केंद्रसरकारमधील सर्व नेत्यांना (पंतप्रधानांसह) हरवलं, यावरुन त्यांचं सर्वस्तरातून कौतुक होत आहे. याच पार्श्वभूमीवर एका कलाकाराने त्यांचं हे पॉवरफुल स्केच बनवलं आहे. सोशल मीडियावर सध्या हे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

06:59 May 03

दीदी ओ दीदी..

Assembly Election Results MEmes

मोदींची दाढी आणि ममतांचं प्लास्टर या दोन गोष्टी निवडणुकीत चांगल्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. या दोन्ही गोष्टींचा वापर करुन तयार केलेलं हे मार्मिक मीम!

06:58 May 03

हावडा ब्रिज वाचला!

Assembly Election Results MEmes
हावडा ब्रिज वाचला!

देशातील सरकारी संस्थांच्या खासगीकरणावरुन कित्येक वेळा पंतप्रधान मोदींना ट्रोल केलं जातं. मोदी हा देश विकत आहेत, अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर, जर बंगालमध्ये भाजपाची सत्ता आली असती, तर मोदींनी हावडा ब्रिजही विकला असता. त्यामुळे सत्ता न आल्यामुळे, हावडा ब्रिज वाचला असं ट्विट एकाने केलं होतं..

06:56 May 03

डोनाल्ड ट्र्म्प काय म्हणतात पाहा..

Assembly Election Results MEmes

ममतांनी नक्कीच भाजपाला 'रेस्ट इन पीस' केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरुन हा मीम शेअर करण्यात आला आहे. हे डोनाल्ड ट्रम्प यांचं अधिकृत अकाऊंट नाही हे वेगळं सांगायला नको..

06:54 May 03

भाजपा कुठे-कुठे हरली रे?

Assembly Election Results MEmes
भाजपा कुठे-कुठे हरली रे?

दक्षिणेकडे भाजपाचा सुपडा साफ झालेला पहायला मिळालाच. उत्तरेकडेही ममतांनी आपली सत्ता कायम राखली. त्यामुळे या सर्व ठिकाणी सत्तेत येण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला सर्वच दिशांनी पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

06:51 May 03

भाजपासह काँग्रेस-डाव्यांचाही 'गेम'..

Assembly Election Results MEmes
भाजपासह काँग्रेस-डाव्यांचाही 'गेम'..

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव झाला असला; तरी काँग्रेस आणि डाव्यांची परिस्थिती त्याहून बिकट झाली होती. त्यामुळेच मतांच्या टॅलीमध्ये आपण वरती नसणार हे त्यांच्या आधीच लक्षात आलं असणार.

06:47 May 03

दक्षिणेत भगवा? नो चान्स!

Assembly Election Results MEmes

दक्षिणेकडील राज्ये आधीपासूनच डाव्या विचारसरणीची राहिल्यामुळे तिथे भाजपाचं 'हिंदुत्व' काही कामाचं नाही, हे पुन्हा सिद्ध झालं. केरळ आणि तामिळनाडूमध्ये तसंही मुख्य लढत स्थानिक पक्षांमध्येच होती. भाजपा आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष तिथे लिंबुटिंबू म्हणूनच होते. तामिळनाडूमध्ये भाजपाला काही जागा मिळाल्या असल्या, तरी केरळमधून भाजपाचा सुपडा साफ झालाय.

06:45 May 03

आधी १०५ घरी बसलेले; आता १०६ बसणार..

दरम्यान, पंढरपूरमधील पोटनिवडणूकही मराठी नेटकऱ्यांमध्ये चर्चेत होती. त्यावरचा हा मीम. भाजपाचे १०५ आमदार निवडून येऊनही महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. एक आमदार जास्त झाला तरी सरकारला त्याचा काहीच धोका नाही. त्यामुळे तोदेखील इतर १०५ प्रमाणे घरीच बसणार आहे, असं या मीमरला म्हणायचंय..

06:42 May 03

आता मोदींचा बॉब मार्ले लुक..

Assembly Election Results MEmes
आता मोदींचा बॉब मार्ले लुक..

बंगाल निवडणुकांपूर्वी मोदींचा दाढी वाढवलेला 'रविंद्रनाथ टागोर' लुक एकदम प्रसिद्ध झाला होता. या निवडणुकीसाठीच त्यांनी हा लुक केल्याची चर्चा लोक समाजमाध्यमांमधून करत होते. त्यामुळे आता पुढच्या गोवा निवडणुकांसाठी मोदींचा 'बॉब मार्ले' लुक आम्हाला पाहायचा आहे, असे ट्विट एकाने केले आहे. या ट्विटला २० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

06:39 May 03

घ्या आता काढा ती दाढी..

मोदींच्या 'टागोर' लुकवरील हा आणखी एक मीम. यामध्ये स्वतः रविंद्रनाथ टागोरच मोदींनी रेझर देताना दाखवले आहेत. हे मीम पाहून तर मोदीही म्हणतील, 'कितने तेजस्वी लोग भरे है हमारे देश में'..

06:35 May 03

राज्यांमध्ये मतांचा, तर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस..

याव्यतिरिक्तही आणखी बरेच मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेषतः मोदींनी ममतांना चिडवण्यासाठी वापरलेले #DidiODidi किंवा #KhelaHobe हे डायलॉग आता लोक त्यांच्याच विरुद्ध वापरु लागले आहेत..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.