श्रीनगर - सैन्यदलाने जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख कमांडरचा पुलवामा येथे खात्मा केला आहे. मोहम्मद इस्माल अल्वी उर्फ अदनान असे मृत दहशतवाद्याचे नाव आहे.
दनान दहशतवाद्याने 2019 मध्ये पुलावामा येथे दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. त्यामध्ये 40 जवानांचा मृत्यू झाला होता. सैन्यदलाच्या हल्ल्यात ठार झालेला अदनान हा जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहरचा नातेवाईक होता. पोलिसांच्या माहितीनुसार अदनान हा पुलावामा येथे आत्मघातकी हल्ला घडवून आणणाऱ्या आदील दरबरोबर राहत होता. दरची व्हायरल क्लिप व्हायरल झाली होती.
हेही वाचा-मोठा घातपात टळला! राजौरी-पुंछ महामार्गावरील आयईडी बॉम्ब निकामी
गेल्या काही वर्षांपासून अदनान काश्मीरमध्ये होता सक्रिय-
काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करत काश्मीर आयजीपी विजय कुमार यांचा संदर्भ घेऊन एन्काउन्टरची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये म्हटले, की मोहम्मद इस्माल अल्वी हा मसूद अझहरच्या कुटुंबातील होता. हा आत्मघातकी हल्ले घडविण्यात सहभागी होता. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, की अदनान भाई उर्फ लम्बू भाई हा पाकिस्तानमधील होता. आयईडी स्फोट तयार करण्यासाठी तो परिचित होता. गेल्या काही वर्षांपासून तो काश्मीरमध्ये सक्रिय होता.
-
#EncounterUpdate: Exact location of #encounter is between Namibian & Marsar, general area #Dachigam forest. 02 unidentified #terrorists killed. Army and Police on job. Search is still going on. @JmuKmrPolice https://t.co/MBpKAleHcZ
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) July 31, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#EncounterUpdate: Exact location of #encounter is between Namibian & Marsar, general area #Dachigam forest. 02 unidentified #terrorists killed. Army and Police on job. Search is still going on. @JmuKmrPolice https://t.co/MBpKAleHcZ
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) July 31, 2021#EncounterUpdate: Exact location of #encounter is between Namibian & Marsar, general area #Dachigam forest. 02 unidentified #terrorists killed. Army and Police on job. Search is still going on. @JmuKmrPolice https://t.co/MBpKAleHcZ
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) July 31, 2021
हेही वाचा-रुग्णालयाचा बेजबाबदारपणा, अर्धांगवायूने त्रासलेल्या रुग्णाच्या चेहऱ्याला लागल्या मुंग्या
चकमकीत दोन दहशतवादी ठार-
-
Top most #Pakistani #terrorist affiliated with proscribed #terror outfit JeM Lamboo killed in today’s #encounter. Identification of second terrorist being ascertained. #Congratulations to Army & @AwantiporPolice: IGP Kashmir@JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) July 31, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Top most #Pakistani #terrorist affiliated with proscribed #terror outfit JeM Lamboo killed in today’s #encounter. Identification of second terrorist being ascertained. #Congratulations to Army & @AwantiporPolice: IGP Kashmir@JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) July 31, 2021Top most #Pakistani #terrorist affiliated with proscribed #terror outfit JeM Lamboo killed in today’s #encounter. Identification of second terrorist being ascertained. #Congratulations to Army & @AwantiporPolice: IGP Kashmir@JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) July 31, 2021
पोलीस, सैन्यदल आणि सीआरपीएफने संयुक्तपणे दक्षिण काश्मीरमध्ये शोधमोहिम सुरू केली. यावेळी पुलावामाच्या नागबेरन तरसार जंगलात दहशतवादी पोलिसांना लपून बसल्याची माहिती मिळाली. सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहोचल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार केल्यानंतर दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. ठार करण्यात आलेल्या दुसऱ्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
पाकिस्तानने पुलवामा येथे केला होता भ्याड हल्ला-
दरम्यान, 14 फेब्रुवारी 2019 ला पुलवामा दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये केंद्रीय पोलीस राखीव दल (सीआरपीएफ)च्या 40 जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरूद्ध संतापची लाट उसळली होती. त्यानंतर केंद्र सरकारवर पाकवर हल्ला करण्याचा दबाव वाढत गेला. या हल्ल्याचा भारतासह जगभरातून अनेक देशांनी पाकिस्तानचा निषेध नोंदवला.