ETV Bharat / bharat

केरळमध्ये पावसाचा हाहाकार : विविध घटनांत 15 जणांचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारी दृश्य

कोट्टायम, पथानामथिट्टा आणि इडुक्की जिल्ह्यात अजूनही पुराचे पाणी हे ओसरलेले नाही. पुराने प्रभापित झालेल्या जिल्ह्यातील घरांमध्ये अद्यापही पाणी भरलेले आहे अनेक घरांना तलावाचे स्वरूप आले आहे. प्रशासनाकडून पुराच्या पाण्याने प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत.

kerala-heavy-rains-updates
केरळमध्ये पावसाचा हाहाकार : विविध घटनात 7 जणांचा मृ्त्यू, पाहा थरकाप उडवणारी दृश्य
author img

By

Published : Oct 17, 2021, 11:21 AM IST

Updated : Oct 17, 2021, 2:22 PM IST

तिरुवनंतपुरम - केरळमध्ये शनिवारी धुव्वादार पावसाने हजेरी लागली होती. सर्वदूर झालेल्या पावसाने केरळमधील विविध नद्यांना पूर आले होते. या पूरात आणि विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनाच्या घटनेत आतापर्यंत 15 (कोट्टायम -12 आणि इडुक्की -3) जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनांच्या घटनांमध्ये 12 जण बेपत्ता झाले आहेत. लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांनी आज (रविवारी) सकाळी भूस्खलनात बेपत्ता झालेल्या नागरिकांची शोधमोहिम चालू केली आहे.

केरळमध्ये पावसाचा हाहाकार, पाहा थरकाप उडवणारी दृश्य

नागरिकांच्या मदतीसाठी मदत छावण्या -

आता मिळालेल्या माहितीनूसार, कोट्टायम, पथानामथिट्टा आणि इडुक्की जिल्ह्यात अजूनही पुराचे पाणी हे ओसरलेले नाही. पुराने प्रभापित झालेल्या जिल्ह्यातील घरांमध्ये अद्यापही पाणी भरलेले आहे अनेक घरांना तलावाचे स्वरूप आले आहे. प्रशासनाकडून पुराच्या पाण्याने प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत.

  • #KeralaRains | Death toll due to heavy rains in Kerala stands at 15 (Kottayam-12 and Idukki- 3): State's Information & Public Relations Department

    — ANI (@ANI) October 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

धरण प्रभावित क्षेत्रात रेड अलर्ट -

पुराने प्रभावित झालेल्या जिल्ह्यात जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झाले आहे. इडुक्की, कोट्टायम आणि पथानामथिट्टा या भागातील नागरिकांना वीज आणि अन्य असुविधांचा सामना करावा लागत आहे. अलाप्पुझा जिल्ह्यात लगातार दुसऱ्या दिवशी ही जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच, केरळ राज्य सरकार ने राज्यात धरण प्रभावित क्षेत्रात रेड अलर्ट लागू केला आहे. कारणकी, राज्यातील मोठ्या प्रमाणात धरणे ही पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

kerala heavy rains updates
केरळमध्ये पावसाचा हाहाकार : विविध घटनात 7 जणांचा मृ्त्यू, पाहा थरकाप उडवणारी दृश्य

2019 च्या विनाशकारी पुराच्या आठवणी झाल्या ताज्या -

शनिवारी मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराच्या मदतीची विनंती केली होती. शनिवारी झालेल्या पावसाने 2018 आणि 2019 च्या विनाशकारी पुराच्या आठवणींना उजाळा दिला. अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की, परिस्थिती नियंत्रणात आहे आणि घाबरण्याची गरज नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले, परिस्थिती गंभीर आहे. ते म्हणाले की, ताज्या हवामानाचा अंदाजाचा हा संकेत आहे की परिस्थिती आता आणखी वाईट होणार नाही.

तामिळनाडूतही सुरू आहे मुसळधार -

त्याचवेळी, अतिवृष्टीने शेजारच्या तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्याच्या अनेक भागांना थैमान घातले, ज्यामुळे थिरपप्पू धबधब्यांमध्ये पूर आला.

हेही वाचा - देशातील सर्वात प्रदूषित परिसर आहे 'लोणी'

Last Updated : Oct 17, 2021, 2:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.