ETV Bharat / bharat

केरळमध्ये 12 वर्षीय मुलाचा निपाह विषाणुच्या संसर्गाने मृत्यू

केरळमध्ये एका 12 वर्षीय मुलाचा निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला आहे. वटवाघूळ हा नैसर्गिक वाहक असल्याने वटवाघळांनी खाल्लेली किंवा चाटलेली फळं खाल्ल्यानं निपाहचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसंच, एखाद्या व्यक्तीला निपाह विषाणुचा संसर्ग झाला असेल तर त्या व्यक्तीपासून इतर व्यक्तीला देखील याचा संसर्ग होऊ शकतो.

Nipah
निपाह
author img

By

Published : Sep 5, 2021, 11:19 AM IST

तिरुवनंतपुरम - कोरोनाच्या संसर्गाचा सामना करत असताना आता कुठेतरी कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. अशातच आता सर्व सामन्यांच्या चिंतेत भर घालणारी आणखीन बातमी समोर आलीय. केरळमध्ये एका 12 वर्षीय मुलाचा निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला आहे.

निपाहच्या संशयित संसर्गाची माहिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने शनिवारी रात्री उशिरा आरोग्य अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. राज्य सरकारने अद्याप निपाह विषाणूची उपस्थिती अधिकृतपणे घोषित केली नसली तरी, सूत्रांनी सांगितले की, आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज रविवारी सकाळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोझिकोडला पोहोचण्याची शक्यता आहे.निपाहचे (एनआयव्ही) दक्षिण भारतातील पहिले प्रकरण 19 मे 2018 रोजी केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात नोंदवले गेले होते. 1 जून 2018 पर्यंत राज्यात या संसर्गामुळे 17 मृत्यू आणि 18 पुष्टीकृत प्रकरणे आहेत.

निपाह विषाणू सर्वात प्रथम कुठे सापडला ?

भारतात या पूर्वी हा 2001 मध्ये पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे निपाह विषाणू सापडला होता. त्यावेळी निपाहची लागण झालेले एकूण 66 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 45 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर पुन्हा 2007 मध्ये पश्चिम बंगाल येथील नादिया येथे निपाहाचे 5 रुग्ण आढळले होते. या पाचही 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

निपाहाची लक्षणे -

प्रचंड ताप येणे, डोकेदुखी, स्नायू दुखी, उलट्या होणे, मानसिक गोंधळ, छातीत जळजळणे, चक्कर येणे आणि बेशुद्ध पडणे ही निपाहची लक्षणे आहेत. तर वटवाघुळ हे या विषाणूची नैसर्गिक वाहक आहेत. वटवाघूळ हा नैसर्गिक वाहक असल्याने वटवाघळांनी खाल्लेली किंवा चाटलेली फळं खाल्ल्यानं निपाहचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसंच, एखाद्या व्यक्तीला निपाह विषाणूचा संसर्ग झाला असेल तर त्या व्यक्तीपासून इतर व्यक्तीला देखील याचा संसर्ग होऊ शकतो.

हेही वाचा - ईडीचा वापर करून केंद्र सरकारकडून विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न - शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.