कौशांबी (यूपी) : जिल्ह्यातील सराई अकिल परिसरात ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. तरुणी प्रियकराशी मोबाईलवर बोलत असताना तिच्या वडिलांनी तिला रंगेहात पकडलं. यानंतर वडिलांसह दोन भावांनी तरुणीवर कुऱ्हाडीने वार केले. या घटनेत घटनास्थळीच मुलीचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वडिलांसह दोन भावांना अटक केली आहे.
गावातील तरुणासोबत होते प्रेमसंबंध : सराई अकील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणाचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघेही अनेकदा भेटत असत. याशिवाय मोबाईलवरही दोघे संवाद साधत होते. एसपी ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, मुलीचा प्रियकर दुसऱ्या समुदायाचा होता. दोघांच्या नातेवाईकांना हा प्रकार कळताच त्यांनी दोघांचीही समजूत घातली होती. मात्र तरीदेखील तरुणी अनेकवेळा मुलाशी भेटत असे. त्यामुळे संतापलेल्या वडिलांसह दोन भावांनी कुऱ्हाडीने वार करत मुलीची हत्या केली आहे.
तीन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या : शनिवारी किशोरी तिच्या प्रियकराशी बोलत होती. यादरम्यान तिच्या पालकांनी तिला फोनवर बोलताना रंगेहात पकडलं. यावरून घरात जोरदार भांडण झालं. यानंतर तरुणीच्या वडिलांसह दोन भावानी तिच्यावर कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली. याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
मुलीच्या हत्येचा गुन्हा मान्य : जिल्हाधिकारी सुजित कुमार, पोलीस अधीक्षक ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांनी घटनास्थळाची पाहणी करत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वडील तसंच तरुणीच्या दोन भावांना घनश्याम, राधेश्याम यांना अटक केली आहे. मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपींनी मुलीच्या हत्येचा गुन्हा मान्य केला आहे, असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.
हेही वाचा -