ETV Bharat / bharat

Surjeet Singh Rathore Karni Sena : करणी सेनेचे नेते सुरजित सिंह राठोडला अटक, महिला मॉडेलने केले गंभीर आरोप

करणी सेनेचे नेते सुरजित सिंह राठोड यांना अंधेरी पश्चिम येथील चार बंगला येथे अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर एका महिला मॉडेलने विनयभंगाचा आरोप केला आहे.

Surjeet Singh Rathore
सुरजित सिंह राठोड
author img

By

Published : Jan 21, 2023, 12:30 PM IST

मुंबई : करणी सेनेचे नेते सुरजित सिंह राठोड यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एका मॉडेलचा विनयभंग आणि छळ केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. मॉडेलने मुंबईतील बांगूर नगर पोलिस स्टेशनमध्ये सुरजित सिंह राठोड यांच्या विरोधात गंभीर आरोप करत एफआयआर दाखल केला होता. आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सुरजित सिंह राठौर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही ते खूप चर्चेत होते.

अंधेरीतून अटक : अंधेरी पश्चिम येथील चार बंगला येथे अटक करण्यात आलेल्या राठोडला शुक्रवारी बोरिवली महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने डिसेंबरमध्ये पोलिसांकडे तक्रार केली होती की, तिच्या नावाने कोणीतरी बनावट इंस्टाग्राम अकाउंट बनवले होते. तिने पुढे आरोप केला की गुन्हेगाराने नातेवाईक, मित्र आणि फॉलोअर्सला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपमानास्पद संदेश पाठवून तिची बदनामी केली.

सुशांतच्या मृत्यूनंतर चर्चेत : सुशांत प्रकरणी सुरजीत यांनी दावा केला होता की, 15 जून 2020 रोजी ते रिया चक्रवर्तीला कूपर हॉस्पिटलच्या शवागारात घेऊन गेले होते, जिथे पोस्टमॉर्टमनंतर सुशांतचा मृतदेह ठेवण्यात आला होता. 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत त्याच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. जेव्हा सुशांतचा मृत्यू आत्महत्या की हत्या अशी चर्चा सुरू होती, तेव्हा सुरजित सिंहने अनेक माध्यमांना दिलेल्या निवेदनात दावा केला होता की, रियाने हॉस्पिटलच्या शवागारात सुशांत सिंह राजपूतच्या छातीवर हात ठेवून सॉरी बाबू म्हटले होते आणि त्यानंतर ती रडू लागली होती.

निर्माता संदीप सिंहवर केले होते आरोप : अखिल भारतीय राजपूत करणी सेनेचे सदस्य सुरजित सिंह राठौर यांनी सांगितले होते की, सुशांतचा चुलत भाऊ आणि आमदार नीरज सिंह बबलू हे त्यांच्या जवळचे आहेत. त्यांनी सुशांत सिंहचा मित्र आणि निर्माता संदीप सिंहवरही गंभीर आरोप केले होते. सुरजीत म्हणाले होते की, 'संदीप सिंह या प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे. मी त्याला नीरजला येऊ द्या असे सांगितले. त्यावर त्याने मला नाही मी सुशांतचा मित्र आहे, असे म्हटले होते. तो माझ्याशी उद्धटपणे बोलला होता. तो रुग्णवाहिकेत सुशांतचा मृतदेह घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला आणि सर्वांना दिशा दाखवत होता. त्याची चौकशी झाली पाहिजे. याप्रकरणी मुंबई पोलीस आणि सीबीआयने संदीप सिंह यांचीही चौकशी केली होती.

हेही वाचा : SSR birth anniversary: स्वप्नं पाहून पूर्ण करण्यासाठी धडपडाणाऱ्या सुशांत सिंहच्या आठवणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.