मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अद्यापही बैठकांचं सत्र सुरू आहे. तर दुसरीकडं भाजपानं जाहीर केलेल्या पहिल्या यादीनंतर आता महायुतीतील दुसरा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनं देखील आपली 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. कोकणात मात्र, सामंत बंधूंना जॅकपोट लागल्याचं चित्र आहे. उदय सामंत यांना रत्नागिरीमधून तर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माहीम विधानसभा मतदार संघातून राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याविरोधात सदा सरवणकर यांची लढत होणार आहे.
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर : याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत रत्नागिरीतून उदय सामंत तर राजापूर विधानसभा मतदारसंघातून किरण सामंत यांना उमेदवारी देण्यात आली. दापोली विधानसभा मतदारसंघातून रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यात मुंबईतील एकूण 36 विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभा मतदारसंघांवर शिंदे गटाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 22, 2024
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.
सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा.@Shivsenaofc… pic.twitter.com/0rBkOkMTMU
अमित ठाकरे यांच्याविरोधात सदा सरवणकर : यातील महत्त्वाची बाब म्हणजे एका बाजुला अमित ठाकरे यांच्यासाठी राज ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघात महायुतीनं उमेदवार देऊ नये, अशी मागणी केल्याच्या चर्चा होत्या. मात्र एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या यादीत माहीम विधानसभा मतदारसंघात आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता जरी महाविकास आघाडीनं अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही, तरी, अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांच्यातील लढत पक्की झाली आहे.
हेही वाचा :