ETV Bharat / bharat

कोण होणार कर'नाटक'चा मुख्यमंत्री, हे आहेत संभावित चेहरे - गोविंद कर्जोल

कर्नाटकातील सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर येडीयुरप्पांनंतर मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा केली जात आहे. यात खाणमंत्री मुरुगेश निराणी, अरविंद बेल्लाड, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

सत्तेचे कर'नाटक' : 'हे' आहेत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे

author img

By

Published : Jul 26, 2021, 12:54 PM IST

Updated : Jul 26, 2021, 4:54 PM IST

बेळगाव : कर्नाटकातील सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर येडीयुरप्पांनंतर मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा केली जात आहे. यात खाणमंत्री मुरुगेश निराणी, अरविंद बेल्लाड, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

मुरुगेश निराणी

मुरगेश निराणी हे कर्नाटकातील बिलगी मतदारसंघाचे आमदार आहेत. ते या मतदारसंघाचे तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत. सध्या कर्नाटक सरकारमध्ये ते खाणमंत्री आहेत. निराणी उद्योग समुहाचे ते मालक आहेत. येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर निराणी यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चिले जात आहे.

अरविंद बेल्लाड

अरविंद बेल्लाड हे हुबळी-धारवाड पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. 2013 पासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. फ्रान्समधून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेले बेल्लाड हे कर्नाटक सरकारमधील उच्चशिक्षीत नेत्यांमध्ये गणले जातात.

प्रल्हाद जोशी

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचेही नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. प्रल्हाद जोशी हे धारवाड मतदारसंघाचे खासदार आहेत. 2004 पासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सध्या ते केंद्रात खाण आणि संसदीय कामकाज मंत्री म्हणून कार्यरत आहेत. केंद्रीय नेतृत्वाचे निकटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जातात.

डॉ. सी एन अश्वथ नारायण

अश्वथ नारायण हे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री असून उच्च शिक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि विज्ञान हे खातेही त्यांच्याकडे आहे. मल्लेश्वरम विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. 2004 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. यावेळी मल्लेश्वरम विधानसभा मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर 2008 मध्ये ते इथून निवडून आले. अश्वथ नारायण हे एमबीबीएस आहेत.

सीटी रवी

सीटी रवी हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि चिकमंगळुरू मतदारसंघाचे आमदार आहेत. यापूर्वी ते कर्नाटक सरकारमध्ये मंत्री होते. मात्र भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. हिंदुत्वाचे कडवे पुरस्कर्ते म्हणून ओळखल्या जाणारे रवी त्यांच्या मुस्लिमविरोधी विधानांनी अनेकदा चर्चेत आले आहेत.

यांच्याशिवाय विजयपुराचे आमदार बसन्नगौडा पाटील यत्नाळ, बसवराज बोम्माई, बीएल संतोष, लक्ष्मण सवडी, गोविंद कर्जोल, विश्वेश्वरा हेगडे कागेरी यांचीही नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत चर्चिली जात आहेत.

हेही वाचा - राजीनाम्याची चर्चा; कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा घेणार राज्यपालांची भेट

Last Updated : Jul 26, 2021, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.