रायचूर - राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘३ इडियट्स’ या चित्रपटामध्ये बोमन इराणी एका प्राध्यपकाची ( व्हायरस/ विरु सहस्त्रबुद्धे) भूमिका साकारली होती. त्यामध्ये दोन्ही हातांनी लिहिण्याची कला विरु सहस्त्रबुद्धेकडे होती असं चित्रपटात दाखवण्यात आलं. सहस्त्रबुद्धेंप्रमाणे एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहिणारे काहीजण जगात आहेत. अशापद्धतीने दोन्ही हातांनी लिहिण्याचा अनोखा विक्रम रायचूरमधील एका व्यक्तीने केला आहे.
कर्नाटकच्या गूदेबेल्लुर येथील रहिवासी बासवराज यांना एकाचवेळी दोन्ही हाताने लिहण्याची कला अवगत आहे. ते आरटीपीएसमध्ये काम करतात. त्यांनी दोन्ही हाताने लिहून गिनीज रेकॉर्ड बनवण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासून त्यांना काहीतरी वेगळे करायचे होते. त्यांना रुग्णवाहिकेवर उलटी अक्षरे पाहून प्रेरणा मिळाली.
वर्ष 2011 मध्ये बासवराज यांनी आपल्या दोन्ही हातांनी लिहण्यास सुरवात केली. सलग अभ्यास केल्यानंतर त्यांनी एकाचवेळी दोन्ही हाताने लिहण्याची कला अवगत केली. प्रथम त्यांनी तेलगू भाषेत लिहण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांनी कन्नड, इंग्रजी आणि हिंदी भाषेत लिहण्याचा अभ्यास केला. आता ते या चारही भाषेमध्ये दोन्ही हाताने सहजतेने लिहू शकतात. बासवराज यांच्या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली आहे.
हेही वाचा - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची डाव्या पक्षांसोबत आघाडी