Karnataka Election : कर्नाटक राज्याची विधानसभा निवडणूक ही सर्वपक्षांसाठी मह्त्वाची होती. या निवडणुकीकडे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची सेमी फायनल म्हणून पाहिले जात होते. या सेमी फायनलमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसने प्रचार करताना कर्नाटकातील जनतेचा विश्वास कमावत बजरंगबलीचा आशीर्वाद विजयाच्या रुपाने मिळवला आहे.
भाजप प्रत्येक निवडणूक पराभूत होणार : काँग्रेसने 136 जागांवर विजय मिळवत भाजपाचा सुपडा साफ केला आहे. घवघवीत यश मिळावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील जनतेचे आणि कर्नाटकमधील नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. कर्नाटकाच्या निवडणुकीत एकाबाजुला भांडवलदारांची ताकद होती, तर दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती होती. या शक्तीने भांडवलदारांच्या ताकदीचा पराभव केला आहे. हेच चित्र आता देशात दिसेल असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन यांनीही अशाच प्रकारचा विश्वास व्यक्त केला आहे. रंजन यांनी निकालपूर्वीच भाजपच्या पराभवाविषयी भाकीत केले होते. निवडणूक मोठ्या फरकाने पराभूत होणार आहे, पुढील काळात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीतही भाजपाचा पराभव होईल, असे ते म्हणाले होते. दरम्यान भाजप नेते बसवराज बोम्मई यांनी पराभव स्विकारत पुन्हा येणार असल्याचे म्हटले आहे. हा निकाल गांभीर्याने घेत पुढच्या वर्षी लोकसभेत दमदार कामगिरी करू असे बोम्मई म्हणालेत.
काँग्रेसने जनतेचे मुद्दे मांडले : भाजपाने धर्म आणि बजरंगबली, आरक्षण, या मुद्द्यांवरुन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला परंतु कर्नाटकाच्या जनतेना त्यांना घरी बसवले. त्याच बाजुला नेहमी जनतेचे मुद्दे घेऊन काँग्रेसने दमदार विजय मिळवला. काँग्रेसने सुरुवातीपासून शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेस सर्वात जास्त भ्रष्टाचाराचा मुद्दा आपल्या प्रचारात लावून धरला, त्याचे फलित म्हणजे 136 जागांवर एक हाती विजय मिळवला.
दमदार नेत्यांचा पराभव : भाजपासाठी कर्नाटक निवडणुकीचा पराभव हा 440 च्या इटक्यासारखी आहे. काँगेसने एक चांगल्या रणनीतीने प्रचार करत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले आहे. यात काँग्रेसने उपस्थित केलेले स्थानिक प्रश्नामुळे भाजपाला कोणताच डाव खेळता आला नाही. काँग्रेसने राहुल गांधींची अपात्रता, ईडी-सीबीआयची कारवाई, अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण हे मुद्दे प्रचारात घेतले नव्हते. रोजगार, महागाई, भ्रष्टाचार, कायदा -सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित करत भाजपावर आरोप केले होते. काँग्रेसच्या या खेळीमुळे भाजपचे दमदार नेते देखील पराभूत झाले.
हे नेते झाले पराभूत : बी श्रीरामुलू, के सुधाकर, जेसी मधुस्वामी, गोविंद करजोल, एमटीबी नागराज, जेसी नारायण गौडा, याचा पराभव झाला आहे. या पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये विधानसभा अध्यक्ष व्ही. हेगडे यांच्या मुलाचा समावेश आहे.
हे मुद्दे राहीले चर्चेत : प्रचारातील मुद्द्यांमुळे कर्नाटक निवडणूक चर्चेत राहिली होती. बजरंग दल आणि पीएफआय बंदी आश्वसन, भाजपाने त्याचा संबंध हिंदुत्व आणि हनुमानाशी जोडला होता. त्यामुळे कर्नाटकातील प्रचार अधिकच चर्चेत आले. डिप्लोमाधारकांना दरमहा 1500 रुपये देण्याची काँग्रेसची घोषणा. गृहिणींनी दरमहा 2000 रुपये देण्याची घोषणा. रोजगार, महागाई, भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था हे मुद्दे प्रचारात चर्चेत राहिले होते.
महाराष्ट्रासाठी सूचक इशारा : विशेष म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागात काँग्रेसने विजय मिळवला आहे. बेळगावात काँग्रेसने 11 जागांवर विजय मिळवला. येथे महाराष्ट्र एकीकरण समितीला पराभव स्विकारावा लागला. या भागात काँग्रेसने मिळवलेले विजय हा महाराष्ट्रासाठी चिंता वाढवाणारे आहे. सीमावर्ती भागाला कोल्हापूर, सांगली , सोलापूर हे जिल्हे गेले आहेत. तसेच या भागात शिंदे-फडणवीस सरकारमधील नेते प्रचारासाठी गेले होते. निवडणुकीपूर्वी भाजपाने कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. एका बाजुला कर्नाटकाला विरोध करणारे देवेंद्र फडणवीस सीमावर्ती भागात भाजपचा प्रचार करण्यासाठी गेले होते. यामुळे भाजपाचे हे वागणे अनेकांना आवडले नाही.
दक्षिणेत भाजपाला विजय मिळणं कठीण : भाजपासाठी कर्नाटक राज्य हे दक्षिण भागातील मजबूत राज्य मानले जात होते. पंरतु या राज्यात भाजपाचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे दक्षिण भारतातील तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांमध्ये विजय मिळवणे मोठे आव्हान झाले आहे. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरी या भागातून लोकसभेसाठी 130 जागा आहेत. त्यात भाजपाकडे फक्त 29 आहेत, त्यातही एकट्या कर्नाटकात 25 जागा होत्या. या पराभवामुळे इतर राज्यात आपला करिष्मा कायम ठेवणे भाजपला अवघड जाणार आहे.
हेही वाचा -
- Karnataka Election Result 2023 : नागरिकांना बदल हवा आहे म्हणत काँग्रेस कार्यालयात जल्लोष सुरू, भाजप, जेडीएस नेते हवालदिल
- Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात भाजपाचं पानीपत होण्यासाठी कारणीभूत ठरले corruption, commission, आरक्षण
- D K Shivakumar: ‘जायंट किलर’ डी. के. शिवकुमार! कर्नाटक काँग्रेसच्या विजयाचे हकदार