ETV Bharat / bharat

उदयपूर हत्याकांडाचा निषेध केला म्हणून कर्नाटकातील भाजप नेत्याची हत्या, तपासात उघड

author img

By

Published : Jul 28, 2022, 9:35 AM IST

दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुलीया येथील भाजपा युवा मोर्चाचे सदस्य प्रवीण कुमार नेट्टारू (वय 31) यांची ( Praveen kumar nettaru murder karnataka ) मंगळवारी हत्या करण्यात आली होती. उदयपूर येथील कन्हैया लाल हत्याकांडाचा निषेध केल्याने प्रवीण यांची हत्या करण्यात आली, असे तपासातून समोर आले आहे.

praveen kumar nettaru murder karnataka
प्रवीण नेट्टारू

बंगळुरू (कर्नाटक) - दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुलीया येथील भाजपा युवा मोर्चाचे सदस्य प्रवीण कुमार नेट्टारू (वय 31) यांची ( Praveen kumar nettaru murder karnataka ) मंगळवारी हत्या करण्यात आली होती. दुचाकीवरील दोन अज्ञात व्यक्तींनी प्रवीण यांच्यावर हल्ला करत घटनास्थळावरून पळ काढला होता. या घटनेचा तपास सुरू असून त्यातून काही माहिती समोर आली आहे. उदयपूर येथील कन्हैया लाल हत्याकांडाचा निषेध केल्याने प्रवीण यांची हत्या करण्यात आली, असे तपासातून समोर आले आहे.

हेही वाचा - Arpita Mukherjee : अबब..! अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरात सापडले 28 कोटींचे घबाड, पैसे भरायला लागले 10 ट्रंक

मानेवर खोलवर जखम झाल्याने मृत्यू - हल्ल्यानंतर प्रवीण यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र मानेवर खोलवर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. प्रवीणचे पुत्तूर जवळील बेल्लारे गावाच्या पेरुवाजे क्रॉसमधे चिकनचे दुकान होते. चार दिवसांपूर्वी अल्पसंख्याक समाजातील तरुणाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नेट्टारू यांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा हिंदू कार्यकर्त्यांनी केला होता.

उदयपूर हत्याकांडाचे केला होता निषेध - तपासाच्या तपशिलांची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, नेट्टारू शांत आणि सौहार्दपूर्ण जीवन जगत होते. जातीय कारणावरून प्रवीण यांना लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 29 जून रोजी फेसबुकवरील त्यांच्या पोस्टमध्ये धार्मिक कट्टरतावादाच्या विरोधात कठोर भाषा वापरली होती. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या प्रेषित मोहम्मद यांच्या बाबतच्या विधानाचे समर्थन करण्यासाठी राजस्थानमधील कन्हैया लालचा शिरच्छेद करण्याच्या कृत्याचा या पोस्टातून निषेध करण्यात आला होता, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा - तामिळनाडू: सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार मोफत नाश्ता, 'असा' आहे 'मेन्यू'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.