ETV Bharat / bharat

KARGIL VIJAY DIWAS : कारगिल युद्धाशी संबंधित 10 धक्कादायक खुलासे

कारगिल युद्धात 26 जुलैला भारताने पाकिस्तानला मात देत विजयश्री मिळवली होती. तेव्हापासून 26 जुलै हा दिवस 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला. कारगिल युद्दनंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. ते जाणून घ्या.

KARGIL VIJAY DIWAS
कारगिल विजय दिवस
author img

By

Published : Jul 26, 2021, 2:15 PM IST

नवी दिल्ली - आज 26 जुलै रोजी कारगिल युद्धाला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. भारताने 1999 साली कारगिल युद्धात पाकिस्तानवर अविस्मरणीय विजय मिळवला होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये तब्बल 60 दिवस हे युद्ध सुरू होते. 'ऑपरेशन विजय' म्हणूनही या युद्धाला ओळखले जाते. अखेर 26 जुलैला भारताने पाकिस्तानला मात देत विजयश्री मिळवली होती. तेव्हापासून 26 जुलै हा दिवस 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला. कारगिल युद्दानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. ते जाणून घ्या.

  1. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा माजी अधिकारी शाहिद अजीजने स्वत: आपल्या देशाचा पर्दाफाश केला होता. पराभवानंतर कारगिल युद्धामध्ये मुजाहिद्दीन सहभागी असल्याचं पाकिस्तानकडून सांगण्यात आलं होतं. मात्र,पाकिस्तानच्या नियमित सैनिकांनीच ही लढाई लढल्याचे अझीझ यांनी सांगितले होते. काही जवानांचे मृतदेह सुद्धा पाकिस्तानने स्वीकारले नव्हते. त्यावर भारतीय जवानांनी अत्यंसस्कार केले.
  2. कारगिल युद्ध सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी तत्कालीन पाकिस्तानी जनरल परवेझ मुशर्रफ यांनी हेलिकॉप्टरमधून नियंत्रण रेषा ओलांडली होती. यासोबतच त्यांनी भारतीय हद्दीत सुमारे 11 किमी आत येत जिकरिया मुस्तकार नावाच्या ठिकाणी एक रात्रही घालविली होती.
  3. कारगिल युद्धाचा काळ अपेक्षेपेक्षा जास्त धोकादायक होता. पराभवाची भीती बाळगून मुशर्रफ यांनी अण्वस्त्रेदेखील वापरण्याची तयारी केली होती.
  4. बऱ्याच काळापासून पाकिस्तानी सैन्य कारगिल युद्ध छेडण्याची तयारी करत होते. पाकिस्तान सैन्याने आपल्या 5000 सैनिकांना कारगिलवर हल्ला करण्यासाठी पाठवले होते. यासाठी त्यांची एक विशेष तुकडी तयार करण्यात आली होती.
  5. कारगिल युद्धातून पाकिस्तानला भारताला माते देत, सियाचिन सोडण्यास भाग पाडायचे होते. कारण, 1984 मध्ये सियाचिवर भारताने ताबा मिळवला होता. तेव्हा जनरल परवेझ मुशर्रफ पाकिस्तानच्या कंमाडो फोर्समध्ये मेजर होते. परवेझ यांना भारताकडून परत सियाचन मिळवायचा होता. यापूर्वीही त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना यश आले नव्हते.
  6. पाकिस्तानचे जनरल परवेझ मुशर्रफ यांनी पंतप्रधान नवाझ शरिफ यांच्या कानावर न घातला अनेक निर्णय स्व:ताच घेतले होते. तसेच त्यांनी कारगिल युद्धाची माहिती त्यांच्या हवाई दल प्रमुखांना सुद्धा दिली नव्हती. मात्र, जेव्हा त्यांना युद्धात विमानांची गरज भासली. तेव्हा हवाई दलाच्या प्रमुखांना याबद्दल सांगण्यात आले. पण, या मोहिमेमध्ये सैन्याला पाठिंबा देण्यास हवाई दल प्रमुखांनी नकार दिला.
  7. पाकिस्तानी वृत्तपत्रानुसार नवाज शरीफ यांनी कबूल केले होते, की कारगिल युद्ध पाकिस्तानी सैन्यासाठी मोठे संकट ठरले. यात पाकिस्तानला 1965 आणि 1971 च्या युद्धांपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले. तसेच पाकिस्तानने 2700 हून अधिक सैनिक गमावले.
  8. कारगिलमध्ये जेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी केली. तेव्हा भारतीय सैन्य दलाचे प्रमुख वेदप्रकाश मलिक पोलंड आणि चेक गणराज्याच्या दौऱ्यावर होते. या युद्धाची माहिती त्यांना भारतीय लष्करी अधिकाऱ्यांकडून नाही. तर तेथील भारतीय राजदूताकडून मिळाली होती.
  9. कारिगल युद्धाची सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे,पाकिस्तानच्या योजनांची भारतीय गुप्तहेर संघटना 'रॉ'ला याची माहिती नव्हती.
  10. कारगिल युद्धातून पाकिस्तानचा दुटप्पीपणा जगासमोर उघड झाला. दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पुढाकर घेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी 1999 साली भेट घेतली. एकिकडे पाकिस्तनने युद्ध होवू देणार नाही. अशी वचने दिली. तर दुसरीकडे कारगिलमध्ये घुसखोरी केली. कारगिलमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर वाजपेयी यांनी नवाज शरिफ यांना फोनवरून नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा - शौर्यगाथा : पाकिस्तानला तोंडघशी पाडत भारतानं हरलेली बाजी कशी पलटवली, जाणून घ्या आज कारगिल दिनी...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.