कानपूर - सैनिकाप्रमाणे रोबो काम करू लागला तर... ही कल्पना 12 वीच्या विद्यार्थ्याने प्रत्यक्षात आणण्यासाठी संशोधन केले आहे. तसेच त्याचे प्रात्याक्षिकही दाखविले आहे. जवाहरनगर येथील ओंकारेश्वर सरस्वती विद्या निकेतन इंटर कॉलेजचा १२ वीचा विद्यार्थी मयंक सक्सेना ( Kanpur 12th student Mayank Saxena ) याने डिफेन्स रोबोटचा प्रोटोटाइप तयार केला आहे. हा रोबो सीमेवर सैनिकाप्रमाणे काम करू ( Mayank Saxena defence robot ) शकतो.
देशाच्या लष्करी संस्थांनी प्रोटोटाइपमधून आधुनिक तंत्रज्ञानाने रोबोट ( robot at border ) तयार केल्यास हा रोबोट सीमेवरील शत्रूंना चोख प्रत्युत्तर देईल, असा दावा विद्यार्थी मयंकने ( Mayank Saxenas robot research ) केला आहे.
रोबोटसोबत बंदूकही इनबिल्ट- ईटीव्ही इंडियाशी खास संवाद साधताना मयंक सक्सेना म्हणाला, की, रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. गुगलच्या ऑड्रिनो प्रोग्रामिंगच्या मदतीने हे तयार करण्यात आले आहे. या रोबोटची किंमत सुमारे पाच हजार रुपये आहे. रोबोट जागेवर 360 अंश फिरू शकतो. रोबोटसोबत बंदूकही इनबिल्ट आहे. एक मीटरच्या अंतरावर शत्रू रोबोटच्या समोर येताच रोबो त्याला लगेच शूट करेल. सीमेवर लँडमाइन्स ठेवल्यास लँडमाइन्समध्ये वापरण्यात येणारा धातू ओळखण्यासाठी या रोबोटमध्ये सेन्सर आहेत. रोबोट लँडमाइन्सपर्यंत पोहोचण्यापूर्वी तो बीप वाजू लागतो. यानंतर रोबोट मागे हटण्यास सुरुवात करतो. रोबोटमध्येही उत्तम दर्जाचा कॅमेरादेखील आहे.
मयंकने सांगितले की, काही दिवसांपूर्वी केंद्रीय अन्न प्रक्रिया राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती शाळेच्या वार्षिक कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यांनी मयंकच्या या प्रोटोटाइपचे कौतुक केले होते. यासोबतच मयंकला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही देण्यात आले.
हेही वाचा-Padmashri Sayyad Bhai Passed Away : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री सय्यद भाई यांचं निधन