ETV Bharat / bharat

'या' निर्णयामुळे कल्याण सिंह बनले राम मंदिर आंदोलनाचे महानायक - राम मंदिर महानायक कल्याण सिंह

6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत जे घडले त्याने कल्याण सिंह यांना राम मंदिर चळवळीचे नायक बनवले. यावेळी कल्याण सिंह यांनी काही निर्णय घेतले. ज्याने त्यांना 'हिंदू हृदयसम्राट' बनवले. वाचा सविस्तस...

ram mandir
ram mandir
author img

By

Published : Aug 22, 2021, 3:04 AM IST

Updated : Aug 22, 2021, 6:49 AM IST

लखनऊ : राम मंदिर आंदोलनानंतर भाजप राष्ट्रीय चेहरा बनला. कमंडलच्या राजकारणाने पक्षाला खूप काही दिले. राजकीयदृष्ट्या, राम मंदिर चळवळीशी संबंधित नेत्यांना खूप फायदा झाला. केंद्राबरोबरच अनेक राज्यांमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले. पण, या सगळ्यामध्ये कल्याण सिंह हे एकमेव मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी राम मंदिराच्या बांधकामासाठी आपल्या सरकारचा त्याग केला. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद संरचना पाडली गेली. यानंतर कल्याण सिंह यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांचे सरकार गेले. प ण त्यांना याबद्दल कधीच खेद वाटला नाही. त्यापेक्षा कल्याण सिंह 6 डिसेंबर 1992 ची घटना आनंदाने स्वीकारत राहिले. त्याचा अभिमान वाटण्याबद्दल बोलत राहिले. यामुळे ते प्रभू रामाचा सर्वात मोठा भक्त आणि मंदिर चळवळीचा नायक बनले.

बाबरी हल्ल्यावेळी गोळ्या झाडण्यास नकार

6 डिसेंबर 1992 च्या सकाळी जेव्हा कारसेवक अयोध्येतील वादग्रस्त संरचनेभोवती जमले होते, तेव्हा फैजाबाद जिल्ह्यातील (आताचा अयोध्या जिल्हा) तत्कालीन जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सरकारला एक लेखी अहवाल पाठवला आणि गोळीबार करण्यास परवानगी मागितली. ज्येष्ठ पत्रकार पी.एन. द्विवेदी म्हणतात, की मुख्य सचिवांनी फैजाबाद जिल्हा प्रशासनाचा अहवाल मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्यासमोर सादर केला. साकेत महाविद्यालयाजवळ तीन ते चार लाख लोक जमले असल्याचे अहवालात स्पष्टपणे लिहिले होते. हे सर्व लिहिताना जिल्हा प्रशासनाने गोळी झाडावी की नाही? असा प्रश्न विचारला होता. त्याच अहवालात जिल्हा प्रशासनाने असेही लिहिले होते, की जर गोळी झाडली गेली तर प्रचंड रक्तपात होईल. मोठा हिंसाचार होईल. त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी गोळीबार न करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. ते म्हणाले होते, की अयोध्येतील परिस्थिती ज्या बिंदूवर पोहोचली आहे, तेथे शूट करणे योग्य होणार नाही. यासाठी कोणतेही औचित्य नाही. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इतर जे काही उपाय करता येतील, ते केले पाहिजेत. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने गोळ्या न झाडता कारसेवकांच्या जमावाला रोखण्याचा प्रयत्न चालू ठेवला. परंतु, पुढे जात त्यांनी वादग्रस्त रचना गाठली आणि ती पाडली. त्यानंतर कल्याण सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

बाबरचा सरदार मीर बाकीने बांधली बाबरी

असे मानले जाते, की 1528 साली बाबरचा सरदार मीर बाकी यांनी राम मंदिर पाडून त्याच्या जागी बाबरी मशीद बांधली. कल्याण सिंह यांनी सांगितले, की परकीय आक्रमक बाबरचा सरदार मीर बाकी हा अयोध्येला गेला होता आणि राम मंदिर पाडून त्याच्या जागी मशीद बांधली होती. त्याने पूजेसाठी मशीद बांधली नाही. पण कोट्यवधी हिंदूंचा अपमान करण्यासाठी त्यांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवला होता. कल्याण सिंह यांनी 6 डिसेंबर 1992 बद्दल सांगितले, की त्या दिवशी तीन महत्वाच्या घटना घडल्या. पहिली घटना बाबरी मशीद पाडणे, दुसरी घटना त्यांचे सरकार गेले आणि तिसरी घटना त्या दिवसापासून राम मंदिराच्या बांधकामाची शक्यता बळकट झाली. अर्थ स्पष्ट आहे की कल्याण सिंह यांना बाबरी विध्वंसाचे श्रेय इतर कोणालाही द्यायचे नव्हते. त्याचे श्रेय त्यांनी स्वतः घेतले.

राम मंदिराच्या पायाभरणी दिवशी काय म्हणाले कल्याण सिंह?

पी.एन. द्विवेदी म्हणतात, की कल्याण सिंह स्वतः म्हणत आहेत की राम मंदिराचे बांधकाम हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस आहे. ते बराच काळ या क्षणाची वाट पाहत होते. 5 ऑगस्ट 2020 रोजी कल्याण सिंह मंदिराच्या पायाभरणी समारंभाच्या निमित्ताने अयोध्येत उपस्थित होते. त्यावेळी कल्याण सिह यांनी म्हटले होते की, 'माझ्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जावे ही माझी आजीवन इच्छा होती, आज ती पूर्ण होत आहे'.

म्हणून गोळीबार करण्यास नकार

कल्याण सिंह प्रत्येक व्यासपीठावर कार सेवकांवर गोळीबार न करण्याच्या निर्णयाचे समर्थन करायचे. अयोध्येतील राम भक्तांवर गोळीबार न करण्याचा मी घेतलेला निर्णय योग्य निर्णय होता, असे ते सांगायचे. जर एकाही राम भक्ताचा पोलिसांच्या गोळ्यांनी मृत्यू झाला असता तर मी स्वतःला माफ केले नसते. मला अभिमान आहे की माझ्या सरकारमध्ये एकही राम भक्त मारला गेला नाही, असेही ते सांगायचे. कल्याण सिंहांना अनेक वेळा माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, त्यांनी बाबरी संरचना वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले होते. म्हणून मी त्याची जबाबदारी स्वीकारली आणि मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मला माझे सरकार जाण्याची खंतही नाही.

'बाबरी हल्ला षडयंत्र नव्हे तर एक उत्स्फूर्त घटना'

अयोध्येतील वादग्रस्त बाबरी संरचना पाडल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या लिब्राहन आयोगाने आपल्या अहवालात कल्याण सिंह यांना दोषी ठरवले होते. पण, एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कल्याण सिंह यांनी लिब्राहन आयोगाच्या अहवालाला कचरा फेकण्यासारखे म्हटले. या मुलाखतीत कल्याण सिंह यांनी काही उदाहरणे दिली होती. कल्याण सिंह म्हणाले, की सुरक्षा व्यवस्था असूनही अमेरीकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. आमच्या सरकारने अयोध्येतील वादग्रस्त रचना वाचवण्यासाठी विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली आहे. पण, घटना घडली. या मुलाखतीत कल्याण सिंह म्हणाले की मी अधिकाऱ्यांना सांगितले होते की वादग्रस्त संरचनेचे रक्षण करण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता ते करा. पण मी गोळीबार करण्याचे आदेश दिले नाहीत. कारण जर मी हजारो कारसेवकांना गोळीबार करण्याचे आदेश दिले असते तर ते मारले गेले असते. राम भक्तांना मारण्याचे पाप मी घेऊ शकलो नसतो. यासह कल्याण सिंह यांनी वादग्रस्त संरचना पाडण्यामागे कोणतेही असल्याचे षडयंत्र नाकारले आणि त्याला ही एक उत्स्फूर्त घटना असल्याचे म्हटले.

बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकरणात कल्याण सिंह यांना सीबीआय तपासालाही सामोरे जावे लागले. पण, ते आपल्या भूमिकेपासून कधीच मागे हटले नाहीत. त्यांनी नेहमी 6 डिसेंबर 1992 च्या घटनेचे वर्णन राष्ट्रीय अभिमानाची घटना म्हणून केले. कल्याण सिंहांच्या याच गोष्टीने बहुसंख्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कदाचित याच कारणामुळे आजही राम मंदिर चळवळीतील या महान नायकाच्या चाहत्यांची कमतरता नाही.

Last Updated : Aug 22, 2021, 6:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.