ETV Bharat / bharat

इकडे कल्याण सिंह जेवत होते, तिकडे कारसेवक चढाई करत होते, नंतर... - कल्याण सिंह माजी मुख्यमंत्री

उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे आज सायंकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून लखनऊ येथील संजय गांधी आयुर्विज्ञान संस्थान (एसजीपीजीआई) मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

kalyan singh passed away
कल्याण सिंह निधन
author img

By

Published : Aug 21, 2021, 11:07 PM IST

Updated : Aug 22, 2021, 9:36 PM IST

लखनऊ (उ.प्र) - उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे आज सायंकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून लखनऊ येथील संजय गांधी आयुर्विज्ञान संस्थान (एसजीपीजीआई) मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. कल्याण सिंह यांचा राजकीय प्रवास कसा होता? यावर 'ईटीव्ही भारत'चा हा आढावा.

हेही वाचा - कल्याण सिंह यांचा आरएसएस कार्यकर्ता ते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा संघर्षमय प्रवास, जाणून घ्या...

कल्याण सिंह यांचा जन्म 5 जनवरी 1932 ला अलिगढ जिल्ह्यातील अतरौली तहसीलच्या मढौली गावात झाला होता. ते दोन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचा राजकीय प्रवास हा खूप उतार चढावाचा होता. 1962 साली कल्याण सिंह यांनी अतरौली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. जनसंघच्या टिकिटावर निवडणूक लढवणारे कल्याण सिंह यांचा सोशलिस्ट पक्षाचे बाबू सिंह यांनी पराभव केला होता.

पाच वर्षांनंतर परत कल्याण सिंह यांनी याच मदतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तेव्हा काँग्रेसचे उमेदवार अमर सिंह यांचा पराभव करून त्यांनी पहिल्यांदा विभानसभेचे सदस्यपद भूषविले. 1975-76 साली जेव्हा देशात आणीबाणीचा काळ आला तेव्हा कल्याण सिंह यांना 21 महिने तुरुगवास भोगावा लागला होता. पुढे जाऊन ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री होते.

आरएसएस आणि भाजपने जेव्हा राम मंदिर आदोलन चालवले तेव्हा त्यात कल्याण सिंह यांनी महत्वाची भूमिका निभवली होती. 1991 मध्ये जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक झाली, तेव्हा त्यात भाजपला राज्यात पूर्ण बहुमत मिळाले होते. यात महत्वाची भूमिका निभवणाऱ्या कल्याण सिंह यांना मुख्यमंत्री पद मिळाले आणि नंतर उत्तर प्रदेशच्या राजनितीमध्ये ऐतिहासिक अशा घटना घडल्या.

6 डिसेंबर 1992 ला दुपारी कल्याण सिंह हे 5 कालिदास मार्ग येथील निवासस्थानावर होते. तिकडे कारसेवक आपल्या कार्यात मग्न होते. लोकं बाबरी मशिदीच्या घुमटावर चढले होते. घटनास्थळावर निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते. इकडे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह आपल्या निवासस्थानी जेवण करत होते. त्यावेळी राज्याचे पोलीस महानिदेशक एसएम त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना कारसेवकांवर गोळ्या झाडण्याची परवानगी मागितली होती. मात्र, कल्याण सिंह यांनी गोळीबार करण्याएवजी लाठी चार्ज आणि अश्रू गॅस सारख्या इतर पद्धती वापरण्याबद्दल म्हंटले आणि नंतर पाहता पाहता बाबरी मशीद ढासळली. यानंतर विधानसभेत 221 जागांसह पूर्ण बहुमत मिळवलेल्या कल्याण सिंह सरकारला राज्यपालांकडे राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर 1997 मध्ये कल्याण सिंह दुसऱ्यांदा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री झाले.

हेही वाचा - KALYAN SINGH बाबरीच्या घटनेनंतर सरकारने गमाविली होती सत्ता, एक दिवसाच्या कैदेची भोगली होती शिक्षा

Last Updated : Aug 22, 2021, 9:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.