नवी दिल्ली - कॉंग्रेसचे दिवंगत नेते देवेंद्र चौरसिया हत्येप्रकरणातील संशयित आरोपी गोविंदसिंह परिहार यांना पोलिसांनी दिलेल्या सुरक्षेप्रकरणी देवेंद्र चौरसिया यांचा मुलगा सोमेश चौरसिया यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावाई करण्यात आली. यादरम्यान, सर्वाेच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे ओढले. उच्च न्यायालयाने आरोपीला सुरक्षा देऊन पोलीस आणि संबंधित यंत्रणेचा गैरवापर केला असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
'न्यायासाठी समांतर व्यवस्था असू शकत नाही' -
डी.वाय. चंद्रचुड आणि ऋषिकेश रॉय यांनी यांनी यावेळी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला. आरोपीना सुरक्षा देण्यासाठी पोलिसांनी सत्र न्यायालयाच्या न्यायधिशांवर दबाव आणला होता. यावरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा तपास पोलीस पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे न्यायालयाने आरोपींचा जामीन रद्द केला होता. यावेळी श्रीमंत लोकांसाठी एक न्याय आणि गरिबांसाठी एक न्याय, अशी समांतर व्यवस्था असू शकत नाही, असे मतही सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. तसेच न्यायधिशांनी राजकिय दबावाला बळी पडू नये, असे न्यायालयाने म्हटले.
हेही वाचा - रत्नागिरी, कोल्हापूर पाण्याखाली : पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल; NDRF पथक रवाना