ETV Bharat / bharat

Joshimath Sinking: जोशीमठमध्ये घरे व हॉटेल्स पाडण्यास सुरुवात.. राहण्यास असुरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर, समितीने सुचवले उपाय

Joshimath Sinking: उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये जमीन खचण्याच्या घटना वाढल्यानंतर आता प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. भेगा पडलेली घरे व हॉटेल्स पाडण्यात येत असून, या भागाला असुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर समितीने सहा उपाय सुचवले Joshimath Sinking Committee Report आहेत. तर नागरिकांच्या विरोधामुळे पाडण्याचे काम तात्पुरते थांबविण्यात आले आहे. joshimath land subsidence

JOSHIMATH SINKING: HOTEL MALARI INN AND MOUNT VIEW WERE DEMOLISHED IN JOSHIMATH
जोशीमठमध्ये घरे व हॉटेल्स पाडण्यास सुरुवात..
author img

By

Published : Jan 10, 2023, 3:15 PM IST

जोशीमठ (उत्तराखंड): Joshimath Sinking: जोशीमठसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. समितीने 6 सूचना दिल्या Joshimath Sinking Committee Report आहेत. समितीने म्हटले आहे की, ऑगस्ट 2022 च्या अहवालात केलेल्या शिफारशींचे तातडीने पालन करावे लागेल. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने जोशीमठ प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत जोशीमठमध्ये जीर्ण इमारती पाडण्याचे काम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत ज्या हॉटेल्स, घरे आणि इमारतींना राहण्यासाठी असुरक्षित घोषित करण्यात आले आहे, ते पाडण्यात येत आहेत. दोन हॉटेलांवर कारवाई सुरू झाली आहे. नागरिकांचा विरोध सुरु झाला असून, घरे पाडण्याचे काम थांबविण्यात आले आहे. joshimath land subsidence

जोशीमठ भूस्खलन हा आता राष्ट्रीय प्रश्न बनला आहे. सीएम धामी यांनी स्थापन केलेल्या समितीने आपल्या सूचना दिल्या आहेत. समितीने दिलेल्या पहिल्या सूचनेनुसार अधिक नुकसान झालेली घरे तातडीने पाडावी लागणार आहेत. घरे पाडल्यानंतर त्याचे तुकडे घटनास्थळावरून तातडीने हटवावे लागतील. त्या सर्व जागा लवकरात लवकर ओळखण्यात याव्यात ज्या यापुढे राहण्यास योग्य नाहीत. तिसर्‍या सूचनेमध्ये असे म्हटले आहे की, ज्या ठिकाणी बाधित लोक राहत आहेत, ते तात्काळ हटवावे लागतील.

चौथ्या सूचनेनुसार जोशीमठ परिसराचा वरचा भाग नीट जाणून घेण्यासाठी भौगोलिक तपासणी करावी लागणार आहे. परिसरात भूकंपाचे निरीक्षण करावे लागेल. पाचव्या सूचनेत असे म्हटले आहे की जलविज्ञान तपासणी करावी. जेणेकरून पाणी कोठून बाहेर पडत आहे, झरे कोठून येत आहेत, स्थानिक पाण्याचा स्त्रोत काय आहे, याचा तातडीने शोध घ्यावा लागेल. सहावी सूचना अशी आहे की जमिनीच्या बुडण्यावर प्रत्यक्ष वेळेत देखरेख करावी लागेल. यासोबतच भेगा असलेल्या घरांचे रेट्रोफिटिंग व्हायला हवे, असे समितीने म्हटले आहे.

जोशीमठची परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. दरड कोसळल्याने सर्वच घरे आणि हॉटेलमध्ये भेगा वाढत आहेत. प्रशासनाने असुरक्षित झोन घोषित केले आहेत. अशा स्थितीत सर्वाधिक बाधित झालेली घरे व इमारती पाडण्याचे काम सुरू झाले आहे. प्रथम संघाने हॉटेल मलारी इन आणि माउंट व्ह्यू Hotel Malari Inn and Mount View demolished पाडले. यावेळी दोन जेसीबी, एक मोठी क्रेन आणि दोन टिप्पर ट्रकसह ६० मजूर उपस्थित होते. त्याचवेळी संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट जोशीमठ परिसरातील परिस्थितीबाबत लष्कराच्या तळावर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत. SDRF टीम अलर्ट मोडवर आहेत.

एसडीआरएफचे पोलीस महानिरीक्षक रिद्धीम अग्रवाल यांच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात जोशीमठमध्ये एसडीआरएफची आठ पथके तैनात करण्यात आली आहेत. इतर तुकड्यांसोबत समन्वय साधून एसडीआरएफची ही पथके भूस्खलन झालेल्या भागांची जागीच पाहणी करत आहेत, तर दुसरीकडे रात्रंदिवस बाधित भागांवर बारीक लक्ष ठेवून त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम करत आहेत. जोशीमठ शहर हळूहळू जमिनीखाली घसरत आहे. येथील लोक खूप घाबरले आहेत. SDRF Inspector General of Police Ridhim Aggarwal

जोशीमठमध्ये घरे, मंदिरे, रुग्णालये, लष्कराच्या इमारती आणि रस्त्यांवरही भेगा पडल्या आहेत. हळुहळु हे सर्व जमिनीत शोषले जात आहे. हा धोका लक्षात घेऊन उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. यासोबतच सॅटेलाईटद्वारे तडे गेलेल्या घरांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आतापर्यंत 600 हून अधिक घरांमध्ये तडे गेले आहेत. ही घरे खाली करून लोकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. शहरातील जी सर्व घरे असुरक्षित आहेत, ती पाडण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. त्याला नागरिकांचा विरोध सुरु झाला असून, घरे पाडण्याचे काम थांबविण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.