जोधपूर (मध्यप्रदेश): Jodhpur Cylinder Blast : शेरगडमध्ये ८ डिसेंबर रोजी झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटाच्या घटनेत मृतांचा आकडा वाढतच चालला Shergarh Gas Cylinder Blast Case आहे. मंगळवारी आणखी चार जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये वराच्या वडिलांचाही समावेश आहे. सोमवारीच वराच्या आईचा मृत्यू झाला होता. या अपघातात आतापर्यंत एकूण 22 जणांचा मृत्यू झाला 22 people died so far आहे. जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी चार मृत्यूंना दुजोरा दिला आहे.
मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी सांगितले की, एदान सिंग, वराचे वडील सगत सिंग, दिलीप कुमार आणि सुगन कंवर यांचा मंगळवारी मृत्यू झाला. दोन दिवसांत 10 जणांचा मृत्यू झाल्याने याठिकाणी दाखल असलेल्या इतर रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे गुरुवारी सुरेंद्र सिंह यांच्या लग्नाची मिरवणूक निघणार होती, त्याचवेळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने कुटुंबातील 52 जण भाजले. त्यांना जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात आणण्यात आले.
वर गंभीर, मेहुणीही - या अपघातात वरात सुरेंद्र सिंहचीही प्रकृती गंभीर आहे. त्यांची बहीण रसाल कंवर आणि मेहुणी पूनम कंवर यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आई धापू कंवर यांचे मंगळवारी निधन झाले. वडील सगत सिंग यांचे आज निधन झाले, घटनेच्या दिवशीच पुतण्याचा मृत्यू झाला होता.