ETV Bharat / bharat

DDC Elections : जम्मू काश्मीरमध्ये सातव्या टप्प्यात 57.22 टक्के मतदान - जम्मू काश्मीर जिल्हा परिषद निवडणूक अपडेट

जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज सातव्या टप्प्यात 57.22 टक्के मतदान झाले. 31 मतदारसंघापैकी 13 काश्मीर आणि 18 जम्मूमध्ये आहेत. काश्मीरच्या 13 मतदारसंघात 34 महिलांसह 148 उमेदवार रिंगणात होते. तर 38 महिलासह 150 उमेदवार जम्मूतील मतदाससंघातून निवडणूक लढवत होते.

जम्मू काश्मीरमध्ये सातव्या टप्प्यात 47. 43 टक्के मतदान

author img

By

Published : Dec 16, 2020, 8:29 PM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज सातव्या टप्प्यात 57.22 टक्के मतदान झाले. सहा लाखांपेक्षा जास्त मतदारांनी 298 उमेदवारांच्या भविष्य मतपेटीत बंद केले आहे. यामध्ये 31 जागांसाठी एकूण 296 उमेदवार मैदानात आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसह आज सरपंचासाठी 69 आणि पंचच्या 438 जागांसाठी मतदान झाले.

31 मतदारसंघापैकी 13 काश्मीर आणि 18 जम्मूमध्ये आहेत. काश्मीरच्या 13 मतदारसंघात 34 महिलांसह 148 उमेदवार रिंगणात होते. तर 38 महिलांसह 150 उमेदवार जम्मूतील मतदाससंघातून निवडणूक लढवत होते.

आठ टप्प्यात मतदान -

पहिला टप्पा 28 नोव्हेंबर, दुसरा टप्पा 1 डिसेंबर, तिसरा टप्पा 4 डिसेंबर, चौथा टप्पा 7 डिसेंबर, पाचवा टप्पा 10 डिसेंबर, सहावा टप्पा 13 डिसेंबरला पार पडला. तर आज सातवा टप्प्यातील मतदान झाले असून आठवा टप्पा 19 डिसेंबरला पार पडेल.

पहिल्यांदा राज्यातील प्रमुख 6 पक्ष एकत्र -

जम्मू काश्मीरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राज्यातील प्रमुख 6 पक्ष एकत्र निवडणूक लढत आहे. कलम 370 हटवण्यात आल्यानंतर राज्यातील नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, सीपीआय (एम), अवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू-कश्मीर पीपल्स पुल्स मूव्हमेंट हे पक्ष 'गुपकर अलायन्स' म्हणून एकत्र निवडणूक लढवत आहेत. यामध्ये भाजपा आणि काँग्रेसचे उमेदवार मैदानात आहेत. सद्य परिस्थितीनुसार राज्यात गुपकर अलायन्स काश्मीरमध्ये मजबूत आहे. तर भाजपाची जम्मूवर पकड आहे.

हेही वाचा - सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्याची स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.