ETV Bharat / bharat

Jignesh Mevani has been convicted गुजरात विद्यापीठातील तोडफोड प्रकरणी जिग्नेश मेवाणी दोषी, सहा महिने कारावास

author img

By

Published : Sep 16, 2022, 8:12 PM IST

2017 मध्ये नामांतराच्या मुद्द्यावरून गुजरात विद्यापीठात तोडफोड करण्यात आली होती. काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना या तोडफोड प्रकरणी दोषी ठरवण्यात ( Jignesh Mevani has been convicted ) आले आहे. न्यायालयाने त्यांना सहा महिने कारावासची शिक्षा सुनावली आहे.

Jignesh Mevani
Jignesh Mevani

अहमदाबाद : अहमदाबाद न्यायालयाने काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांना ६ महिन्यांचा तुरुंगवास सुनावण्यात ( Jignesh Mevani has been convicted ) आला आहे. 2016 मध्ये नामांतराच्या मुद्द्यावरून गुजरात विद्यापीठाची तोडफोड करण्यात आली होती. तोडफोड प्रकरणात जिग्नेश मेवाणी दोषी आढळले असून न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. आमदार जिग्नेश मेवाणी यांच्यासह एकूण 20 आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अहमदाबाद मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने विद्यापीठ कॅम्पसमधील तोडफोड प्रकरणात एकूण 20 जणांना दोषी ठरवले आहे. ज्यामध्ये आमदार जिग्नेश मेवाणी, सुबोध परमार, राकेश मेहरिया यांच्यासह 20 आरोपींचा समावेश आहे. यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे.

सन 2016 मध्ये नामांतराच्या मुद्यावरून विद्यापीठात तोडफोड करण्यात आली होती. आज न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणात शिक्षा सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने तीन वेगवेगळ्या प्रकरणात शिक्षा जाहीर केली आहे. या तीनपैकी एका प्रकरणात सहा महिने कारावास, दुसऱ्या प्रकरणात ५०० रुपये आणि तिसऱ्या प्रकरणात १०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

आरोपींची नावे – जिग्नेश मेवाणी, राकेश मेहरिया, फेनिल मेवाडा, अमित चावडा, विरल मेवाणी, भूपत सोलंकी, धीरज प्रियदर्शी, जय परमार, नरेश परमार, चंद्रेश वानिया, शांतीलाल राठोर, भरत परमार, यश मकवाना, किरीट परमार, रणजीत वाघेला, दीक्षित परमार., जगदीश सोळंकी, कमलेश सोळंकी, आशा राठोड यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.