दिसपूर ( आसाम) - आसाम पोलिसांनी गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांना अटक करून आसाममधील कोकराझारमध्ये ( Assam police arrest Jignesh Mewani ) आणले आहे. वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
आमदार जिग्नेश मेवाणी यांना अटक करणाऱ्या पथकाचे नेतृत्व हे कोकराझार जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ( ASP of Kokrajhar district ) सुरजीत सिंह पानेसर ( Surjit Singh Panesar ) यांनी केले. त्यांनी आमदार जिग्नेश मेवाणी यांना गुजरातमधील पालनपूरमधून अटक केली आहे. त्यांना विमानाने गुवाहाटीमधील सदार पोलीस स्टेशनमध्ये प्रथम आणण्यात आले. मेवाणी यांना कोकराझारमधील पोलीस स्टेशनमध्ये आणले जात असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात 18 एप्रिलला वादग्रस्त ट्विट केल्याचा मेवाणी यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी आसाममध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
गुरुवारी आसामला हलविले-गुजरातमधील अपक्ष आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी ( MLA Jignesh Mevani news ) यांना बुधवारी रात्री उशिरा आसाम पोलिसांनी अटक ( Assam Police Arrest Jignesh Mevani ) केली. मेवाणी यांना बुधवारी 11.30 च्या सुमारास गुजरातच्या पालमपूर सर्किट हाऊस येथून अटक ( MLA Jignesh Mevani arrest news ) करण्यात आली. मेवाणी यांना बुधवारी रात्री अहमदाबाद येथे नेण्यात आले. आज त्यांना आसामला नेण्यात आले.
काय आहे प्रकरण- मेवाणी यांना अटक का करण्यात आली? हे स्पष्ट नाही. मात्र, मेवाणी यांच्या ट्विटर अकाउंटवरील त्यांच्या ट्विट्सवर कारवाई झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर, आसाममध्ये जिग्नेश मेवाणी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप एफआयआरची प्रत दिलेली नाही. यावर, माझ्या एका ट्विटसंबंधी माझ्यावर अटकेची कारवाई झाली, तसेच पोलिसांनी याबाबत नेमकी माहिती दिली नाही, असे जिग्नेश मेवाणी यांचे म्हणणे आहे.
काँग्रेस आक्रमक-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी जिग्नेशच्या समर्थनार्थ आणि आसाम पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आरएसएसवर ट्विट केल्याबद्दल जिग्नेश यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारींना जिग्नेश आणि काँग्रेस घाबरत नाही. आमची कायदेसंदर्भातील टीम जिग्नेशसाठी लढा देईल आणि त्यांची सुटका करेल, असा विश्वास जगदीश ठाकोर यांनी व्यक्त केला.