ETV Bharat / bharat

झारखंडचे मुख्यमंत्री राजीनामा देणार? हेमंत सोरेन यांच्या पत्नी निवडणूक लढवण्याच्या चर्चा; काय आहे प्रकरण - Jharkhand CM

Jharkhand CM Resign : झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार सरफराज अहमद यांनी अचानक राजीनामा दिला. तो तत्काळ स्वीकारण्यातही आला. दुसरीकडे, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीनं दिलेल्या समन्सची मुदत संपली आहे. या सगळ्यांचे अनेक अर्थ जोडले जात आहेत.

Hemant Soren
Hemant Soren
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 5:22 PM IST

रांची (झारखंड) Jharkhand CM Resign : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. गिरीडीहच्या गांडेयतून झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) आमदार सरफराज अहमद यांनी ३१ डिसेंबरला अचानक राजीनामा दिला. त्यांचा हा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला आहे. मात्र त्यांनी अचानक राजीनामा का दिला, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

  • झारखंड के गांडेय विधायक सरफराज अहमद ने विधानसभा से इस्तीफ़ा दिया,इस्तीफ़ा स्वीकार हुआ । हेमंत सोरेन जी मुख्यमंत्री पद से इस्तीफ़ा देंगे,झारखंड की अगली मुख्यमंत्री उनकी पत्नी कल्पना सोरेन जी होंगी । नया साल सोरेन परिवार के लिए कष्टदायक @itssuniltiwari pic.twitter.com/jl06AtXurh

    — Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) January 1, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेमंत सोरेनना ईडीचा दणका : या घटनाक्रमाची पार्श्वभूमी अशी की, ईडीनं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याभोवती आपला फास घट्ट केला आहे. ईडीनं जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या नावे समन्स जारी करून दोन दिवसात आपलं म्हणणं स्पष्ट करण्यास सांगितलं होतं. ३१ डिसेंबरला ही मुदत संपली. ईडीनं समन्समध्ये स्पष्ट केलं होतं की, पीएमएलए २००२ च्या कलम ५० अंतर्गत तुम्हाला तुमचं म्हणणं नोंदवण्याची शेवटची संधी दिली जात आहे. तुम्हाला हे मान्य नसेल, तर तुम्ही जाणूनबुजून तपासावर प्रभाव टाकत आहात, असं समजलं जाईल.

  • राज्यपाल झारखंड @CPRGuv को क़ानूनी सलाह लेना चाहिए,झारखंड विधानसभा का गठन 27 दिसंबर 2019 को हुआ । सरफराज अहमद का इस्तीफ़ा 31 दिसंबर को हुआ। एक साल से कम समय में चुनाव नहीं हो सकता । यह पार्टी हेमंत सोरेन जी की नहीं शिबू सोरेन जी की है@SitaSorenMLA @BasantSorenMLA विधायक हैं,चम्पई…

भाजपा खासदाराचा दावा : राजकीय विश्लेषकांच्या मते, मुख्यमंत्री हेमंत सोरेन त्यांच्या 'प्लॅन बी' वर काम करत आहेत. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्या 'X' हँडलवरून पोस्ट करत, हेमंत सोरेन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील आणि त्यांची पत्नी कल्पना सोरेन झारखंडच्या पुढील मुख्यमंत्री बनतील, असं म्हटलंय.

गांडेय जागेवर जेएमएमचं वर्चस्व : गांडेय ही जागा जेएमएमसाठी अनेक प्रकारे महत्त्वाची आहे. येथील विजयाचं गणित आदिवासी आणि मुस्लिम वर्गाच्या मतांवर अवलंबून असतं. सर्फराज अहमद यांनी 2005 मध्ये आरजेडीकडून या जागेवर निवडणूक लढवली होती. परंतु त्यावेळी जेएमएमच्या सालखन सोरेन यांनी त्यांचा पराभव केला. 2009 मध्ये, सर्फराज अहमद यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी सलखान सोरेन यांच्याकडून 2005 मधील पराभवाचा बदला घेतला. 2014 मध्ये सरफराज अहमद यांनी पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र मोदी लाटेत भाजपाचे जेपी वर्मा विजयी झाले. या निवडणुकीत सर्फराज अहमद तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. 2019 च्या निवडणुकीत ही जागा युतीच्या नियमांप्रमाणे जेएमएमकडे गेली. त्यामुळे सर्फराज अहमद कॉंग्रेस सोडून जेएनएममध्ये सामील झाले आणि त्यांनी विजयाची नोंद केली.

कल्पना सोरेन जागा घेऊ शकतात : यावरून हेमंत सोरेन यांचं संपूर्ण नियोजन ठरल्याचं दिसतंय. झारखंडमध्ये जेएमएम, आरजेडी आणि काँग्रेसची युती आहे. त्यांना डाव्यांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हेमंत सोरेन कधीही राजीनामा देऊ शकतात, हे निश्चित मानलं जातंय. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन त्यांची जागा घेऊ शकतात. कारण एकेकाळी शिबू सोरेन यांच्यासारखे नेते मुख्यमंत्री असताना तमाड जागेवरून निवडणूक हरले होते. त्यामुळे या सर्व समीकरणांचा विचार करता गांडेयची जागा विजयासाठी सर्वात योग्य मानली जात आहे. साहजिकच 2024 मध्ये झारखंडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल ही शक्यता वर्तवली जातेय.

हे वाचलंत का :

  1. INDIA आघाडी तुटण्याच्या मार्गावर? शिवसेना महाराष्ट्रात २३ जागांवर ठाम, ममता बॅनर्जींचा बंगालमध्ये एकला चलोचा नारा
  2. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांचा राजीनामा, नितीश कुमार यांच्या हाती पुन्हा पक्षाची धुरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.