हिंदू धर्मात जया एकादशीला विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला 'जया एकादशी' म्हणतात. 2023 मध्ये बुधवार, 1 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत केले जाणार आहे. या दिवशी व्रत पाळताना भगवान विष्णूची पूजा केली जाते. जया एकादशीला 'भूमी एकादशी' आणि 'भीष्म एकादशी' असेही म्हणतात.
जया एकादशी तिथी आणि मुहूर्त : पंचांग नुसार, जया एकादशी तिथी 31 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11:53 वाजता सुरू होईल आणि 1 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 02:01 वाजता समाप्त होईल. शास्त्रानुसार एकादशीचे व्रत फक्त उदय तिथीनुसारच वैध आहे. त्यामुळे १ फेब्रुवारीला जया एकादशीचे व्रत केले जाणार आहे.
जया एकादशी 2023 मुहूर्त : जया एकादशी 2023 व्रत - 01 फेब्रुवारी 2023, बुधवार रोजी आहे. माघ शुक्ल एकादशी तारीख प्रारंभ - 31 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11:53 वाजता आहे. माघ शुक्ल एकादशीची समाप्ती ही ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ०२:०१ वाजता आहे. जया एकादशी 2023 पुराण वेळ - 02 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 07:09 ते सकाळी 09:19 वाजेपर्यंत, पारण तिथीला द्वादशी समाप्ती वेळ - 02 फेब्रुवारी रोजी दुपारी 04.26 वाजताची असेल.
जया एकादशी पूजा विधि : जया एकादशी व्रताच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून भगवान श्री हरी विष्णूला नमस्कार करावा आणि व्रताचा संकल्प करावा. यानंतर गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करून आमचन करून शुद्धि करावी. यानंतर, भगवान श्री हरी विष्णूची (भगवान श्री हरी विष्णू पूजा) पूजा करा आणि त्यांना पिवळी फुले, पिवळी फळे, पिवळी मिठाई, धूप-दीप, कुमकुम, तांदूळ, अगरबत्ती इत्यादी अर्पण करुन पूजा करावी. शेवटी आरती करून प्रसाद वाटप करावा.
जया एकादशीचे महत्त्व : भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला जया एकादशीचे महत्त्व सांगितले होते की, या व्रतामुळे 'ब्रह्महत्या' सारख्या पापातूनही मुक्ती मिळते. जया एकादशी अत्यंत शुभ मानली गेली आहे. या एकादशीचे व्रत केल्याने मनुष्य भूत, पिशाच अशा दुष्ट आत्म्यांपासून मुक्त होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. जया एकादशीचे व्रत केल्याने माणसाला अश्वमेध यज्ञासारखे पुण्य प्राप्त होते.