नवी दिल्ली : खाद्यपदार्थांच्या बाबतीत भारत नेहमीच अव्वल राहिला आहे. विविध पाककृतींचा आस्वाद घेणाऱ्यांसाठी भारत हे एक अतिशय आकर्षक ठिकाण आहे. दरम्यान जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी आपल्या पत्नीसोबत पुण्यात जेवणाचा आस्वाद घेताना दिसले. याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष वेधले गेले. जपानचे राजदूत सुझुकी यांनी आपल्या पत्नीसह पुण्यातील मिसळ, वडापाववर ताव मारत असून त्यांनी तो व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी ज्याप्रकारे व्हिडिओ शेअर केला त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी खूश झाले आहेत. यानंतर मोदींनी भारतातील खाद्य वैविध्य नाविन्यपूर्ण पद्धतीने मांडण्याच्या राजदूताच्या पुढाकाराचे कौतुक केले.
-
My wife beat me!🌶#Pune #Kolhapuri pic.twitter.com/JsM1LxcRK5
— Hiroshi Suzuki, Ambassador of Japan (@HiroSuzukiAmbJP) June 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">My wife beat me!🌶#Pune #Kolhapuri pic.twitter.com/JsM1LxcRK5
— Hiroshi Suzuki, Ambassador of Japan (@HiroSuzukiAmbJP) June 10, 2023My wife beat me!🌶#Pune #Kolhapuri pic.twitter.com/JsM1LxcRK5
— Hiroshi Suzuki, Ambassador of Japan (@HiroSuzukiAmbJP) June 10, 2023
व्हिडिओ केला शेअर : सुझुकीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते आपल्या पत्नीसह पुण्यात जेवणाचा आस्वाद घेत आहेत. “मला भारताचे स्ट्रीट फूड आवडते, पण थोडे कमी तिखट, असा कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्यांची पत्नी मसालेदार निवडते तर सुझुकी कमी मसालेदार अन्न निवडते. सुझुकीने ट्विटरवर आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते 'मिसळ पाव' चा आस्वाद घेताना दिसत आहे. त्यांच्या पत्नीनेही मिसळ पावचा आस्वाद घेतला दोघेही मिसळ मागवतात. पण सुझुकीने यांच्य पत्नी कोल्हापूर मसालेदार 'मिसळ पाव' निवडते. यावर सुझुकीने यांनी व्हिडिओसोबत लिहिले की, माझ्या पत्नीने माझा पराभव केला.
-
This is one contest you may not mind losing, Mr. Ambassador. Good to see you enjoying India’s culinary diversity and also presenting it in such an innovative manner. Keep the videos coming! https://t.co/TSwXqH1BYJ
— Narendra Modi (@narendramodi) June 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">This is one contest you may not mind losing, Mr. Ambassador. Good to see you enjoying India’s culinary diversity and also presenting it in such an innovative manner. Keep the videos coming! https://t.co/TSwXqH1BYJ
— Narendra Modi (@narendramodi) June 11, 2023This is one contest you may not mind losing, Mr. Ambassador. Good to see you enjoying India’s culinary diversity and also presenting it in such an innovative manner. Keep the videos coming! https://t.co/TSwXqH1BYJ
— Narendra Modi (@narendramodi) June 11, 2023
पंतप्रधान मोदींनी केले कौतुक : दरम्यान त्यांच्या या व्हिडिओवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजदूत यांचा व्हिडिओ शेअर करण्याचा अंदाज पंतप्रधान मोदींना खूप आवडला. त्यांच्या व्हिडिओला ट्विटमध्ये टॅग करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले की, "श्री राजदूत, ही एक स्पर्धा आहे ज्यात तुम्हाला हरायला हरकत नाही. तुम्हाला भारतातील स्वयंपाकाच्या विविधतेचा आस्वाद घेताना आणि ते अशा नाविन्यपूर्ण पद्धतीने सादर करताना पाहून आनंद झाला.”
एरिक गार्सेटींनीही भारतीय खाद्यपदार्थांचा घेतला आस्वाद : अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी हे देखील स्थानिक भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना दिसले. हैदराबादी गोश्त बिर्याणी आणि खुबनी का मिठा यासह काही स्वादिष्ट हैदराबादी खाद्यपदार्थ त्यांनी चाखले होते. तर गेल्या महिन्यात, भारतातील नवनियुक्त यूएस राजदूतांनी, प्रतिष्ठित चारमिनारला भेट दिली आणि स्मारकाचे कौतुक करताना एक कप चहा चाखला.