चेन्नई : शुक्रवारी पहाटे जनशताब्दी एक्स्प्रेस ट्रेनचे दोन चाके रुळावरून घसरल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. रेल्वे बेसिन ब्रिज वर्कशॉपजवळ असताना हा अपघात झाला.ही ट्रेन आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथून चेन्नईला गेली होती. काळ रात्री 12 वाजता चेन्नईला पोहोचल्यानंतर सेंट्रल रेल्वे स्थानकावर प्रवाशांना उतरवण्यात आले. त्यानंतर ही रेल्वे ब्रिज वर्कशॉपजवळ जात होती त्याचवेळी रेल्वेचे दोन चाके रुळावरुन घसरले.
दोन तासात रेल्वे आली रुळावर : रेल्वेच दोन चाके रुळावरु घसल्याचे दिसल्यानंतर रेल्वे तात्काळ थांबवण्यात आली. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वेचे चाके पूर्वपदावर आणण्यात आली. तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वे रुळावर आली. दरम्यान रेल्वे पोलीस अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. चाके रुळावरुन खाली घसल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
तमिळनाडूत घडला होता अपघात : गुरुवारीही अशी घटना तामिळनाडूमध्ये घडली होती. निलगिरी माउंटन रेल्वे ट्रेन कुन्नूर रेल्वे स्थानकावरून निघाल्यानंतर अवघ्या काही मीटरवर अंतर गेल्यानंतर रुळावरुन घसरली होती. त्यावेळी प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. ही रेल्वे मेट्टुपलायमच्या दिशेने जात होती. कुन्नूरहून ही रेल्वे निघाल्यानंतर काही अंतर जाताच हा अपघात घडला होता, अशी माहिती रेल्वे अधिकाऱयांनी दिली. या रेल्वेचा चौथा डबा रुळावरुन घसरला होता, त्यामुळे अभियंत्यांनी तात्काळ ट्रेन थांबवली. या रेल्वेत साधारण 150 प्रवाशी होते. रेल्वे थांबल्यानंतर रेल्वेतील प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आणि मेट्टुपलायमला जाणाऱ्या एका बसमध्ये बसवण्यात आले होते. या घटनेत कोणतीही दुखापत झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे रुळावरून का घसरली याचा तपास केला जात आहे. आज शुक्रवारी सकाळपर्यंत मार्गावरील सेवा पुन्हा सुरू झाली.