ETV Bharat / bharat

Road Accident In Kashmir : तीनशे फूट दरीत कोसळली बस: दोडा जिल्ह्यात भीषण अपघातात 36 प्रवाशांचा मृत्यू

Jammu Kashmir Acciden : काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Road Accident In Kashmir
अपघातात कोसळलेली बस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 1:57 PM IST

Updated : Nov 15, 2023, 2:17 PM IST

श्रीनगर Road Accident In Kashmir : बस दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना जम्मू काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील आसेर परिसरात घडली आहे. 55 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस आसेर परिसरातील खोल दरीत कोसळली आहे. रोडवरुन घसरुन ही बस खोल दरीत कोसळल्याची माहिती जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी दिली आहे.

बटोटे-किश्तवार राष्ट्रीय महामार्गावरील त्रंगल-आसेरजवळ बसचा भीषण अपघात झाला आहे. 55 प्रवाशांना घेऊन जाणारी बस 300 फूट दरीत कोसळली आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच प्रशासनाकडून बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. २५ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. - रमेश कुमार, विभागीय आयुक्त, जम्मू

तीनशे फूट खोल दरीत कोसळली बस : जम्मू काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात बुधवारी सकाळी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. बाटोटे किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावरुन बस ( क्रमांक JK02, CN 6555 ) ही तृंगाल आसार परिसरातून जात होती. यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस तीनशे फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या बसमधील 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बसमधील 25 प्रवाशांचा मृत्यू : दोडा जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात तब्बल 36 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धाव घेतली. अपघातस्थळावर स्थानिक नागरिकांनी बचावकार्याला सुरुवात केली. मात्र खोल दरीत बस कोसळल्यानं बचावकार्यात अडथळे आले. तीनशे फूट खोल बस दरीत कोसळल्यानं बसमधील 36 प्रवाशांचा मृत्यू झाला असून आणखी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

  • Union Minister Jitendra Singh tweets, "Just now spoke to DC Doda, J&K, Harvinder Singh after receiving information about the bus accident in Assar region. Unfortunately 5 are dead. Injured being shifted to District Hospital Kishtwar and GMC Doda as per requirement. Helicopter… pic.twitter.com/ThxhDjc4CZ

    — ANI (@ANI) November 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नायब राज्यपालांनी व्यक्त केलं दु:ख : "दोडा जिल्ह्यात बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात नागरिकांचा मृत्यू झाल्यानं प्रचंड दु:ख झालं. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी मी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. पीडित प्रवाशांना आवश्यक ती सगळी मदत करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत", अशी माहिती जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी एक्सवर पोस्ट करुन दिली आहे.

हेही वाचा :

Bus Accident : सुसाट बसनं वाहनांना चिरडलं, एकाचा मृत्यू; पाहा थरारक व्हिडिओ

जम्मू काश्मीरमधील दोडा येथे कार दरीत कोसळली, अपघातात 5 जण ठार

Last Updated : Nov 15, 2023, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.