ETV Bharat / bharat

Smuggled Gold Seized At Jaipur Airport : जयपूर विमानतळावर मोठी कारवाई.. दुबईहून आणलेले १९ लाखांचे तस्करीचे सोने जप्त.. - जयपूर विमानतळावर मोठी कारवाई

जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने 19 लाख 45 हजार रुपयांचे सोने पकडले ( Jaipur International Airport Gold Smuggler caught ) आहे. सोन्याची तस्करी करून हा प्रवासी दुबईहून आला होता. त्याने बुटाच्या तळव्यात सोने लपवले होते.

जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळा
जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
author img

By

Published : Mar 25, 2022, 5:52 PM IST

जयपूर : जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकामागून एक सोन्याच्या तस्करीची प्रकरणे समोर येत आहेत. गेल्या वर्षभरातच सोन्याच्या तस्करीच्या घटना विचित्र पद्धतीने समोर आल्या आहेत. यावेळी तस्कराने हे सोने बुटांमध्ये लपवून ठेवले होते. कस्टम विभागाच्या पथकाने विमानतळावर 369.900 ग्रॅम तस्करीचे सोने पकडले असून, त्याची किंमत सुमारे 19.45 लाख इतकी ( Jaipur International Airport Gold Smuggler caught ) आहे. दुबईहून स्पाइस जेटच्या फ्लाइटमधून हा प्रवासी तस्करीचे सोने घेऊन जयपूरला पोहोचले होते.

सोने घेणारा आणि देणारा दोघेही रंगेहात पकडले : सीमाशुल्क विभागाने प्रवाशाला विमानतळावरच बाहेर जाताना पकडले. यावेळी कस्टम विभागाच्या पथकाने सोने देणारा आणि घेणारा दोघांनाही पकडले आहे. विमानतळाबाहेर प्रवासी दुसऱ्या व्यक्तीला सोने देत होते. त्यादरम्यान कस्टमच्या पथकाने दोघांना पकडले. प्रवाशाच्या चपलाचा सोल द्रव स्वरूपात असलेल्या सोन्याने भरला होता. सीमाशुल्क आयुक्त राहुल नांगरे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त बी. बी. अटल यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

हालचाली संशयास्पद वाटल्याने तपासणी : कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रवासी गुरुवारी स्पाइसजेटच्या फ्लाइट क्रमांक SG-713 ने जयपूर विमानतळावर पोहोचला होता. प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कस्टम विभागाच्या पथकाने त्याचा पाठलाग केला. प्रवाशाचे सामान घेण्यासाठी आणखी एक व्यक्ती विमानतळाबाहेर आली. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर सीमाशुल्क पथकाने चौकशी सुरू करताच प्रवाशी हा गोंधळून गेला आणि समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.

द्रव स्वरूपात सोने: प्रवासी आपले सामान बाहेर दुसऱ्या व्यक्तीला देत होता. त्यामुळे संशयावरून कस्टम विभागाच्या पथकाने प्रवाशाच्या सामानाची झडती घेतली. झडतीदरम्यान, प्रवाशाच्या शूजमध्ये दोन पारदर्शक पॉलिथिन कॅप्सूल सापडले. ज्यामध्ये पिवळ्या दाणेदार पेस्टच्या स्वरूपात सोने लपवले होते. यानंतर प्रवाशाने कबूल केले की, तो ज्याच्या हाती माल देत होता तोच सोने घेण्यासाठी आला होता. कस्टम विभागाच्या पथकाने सोन्याचे वजन केले असता ते 369.900 ग्रॅम असल्याचे आढळून आले. सीमाशुल्क विभागाने हे सोने सीमा शुल्क कायदा १९६२ च्या तरतुदीनुसार जप्त केले. दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.