ETV Bharat / bharat

Ambikesh Mahapatra Cartoon : ममता बॅनर्जींवरील विवादित कार्टून प्रकरणी अंबिकेश महापात्रा यांना न्यायालयाची क्लीन चिट

author img

By

Published : Jan 21, 2023, 9:57 AM IST

जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक अंबिकेश महापात्रा यांनी 2012 मध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टवर ममता बॅनर्जी, दिनेश त्रिवेदी आणि मुकुल रॉय यांची छायाचित्रे होती. या पोस्टनंतर अंबिकेश महापात्रा यांना अटक करण्यात आली होती. आज तब्बल 11 वर्षांनंतर महापात्रांची त्या खटल्यातून सुटका झाली आहे.

Ambikesh Mahapatra
अंबिकेश महापात्रा

कोलकाता : जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक अंबिकेश महापात्रा यांना कार्टून प्रकरणात 11 वर्षांनंतर मोठा दिलासा मिळाला आहे. अलिपूर जिल्हा न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला 11 वर्षे जुना खटला गुरुवारी निकाली काढला.

'माझ्यावर रद्द झालेले कलम लावले ' : प्रोफेसर महापात्रा यांनी शुक्रवारी ईटीव्ही भारतला सांगितले की, ' माझ्याविरुद्ध षड्यंत्र रचून हा खटला थांबवण्यात आला. पण मी हार मानली नाही. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 66, जे रद्द झाले आहे, ते माझ्याविरुद्ध लावण्यात आले,' असे प्राध्यापक महापात्रा ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले. 'इतर राज्यांमध्येही हे कलम लावून भाषण स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला,' असे त्यांचे म्हणणे आहे.

'ममता सरकारला टीका नको' : '2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका जनहित प्रकरणात हे कलम रद्द केले. परंतु राज्यातील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी 2011 मध्ये सत्तेवर आल्यानंतर लोकशाहीविरोधी कृत्ये सुरू केली. त्यांनी एक ट्रेंड सुरू केला जो आजही सुरू आहे', असे विद्यापीठाचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक महापात्रा यांनी सांगितले. 'ममता बॅनर्जी सरकारला टीका नको आहे कारण जर कोणी त्यांच्या पक्षावर आणि सरकारवर टीका केली तर त्या व्यक्तीचे भाषण स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी ते पोलिस प्रशासनाचा गैरवापर करतात', असे महापात्रा पुढे म्हणाले.

काय आहे प्रकरण? : जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक अंबिकेश महापात्रा यांनी 2012 मध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टवर ममता बॅनर्जी, दिनेश त्रिवेदी आणि मुकुल रॉय यांची छायाचित्रे होती. या पोस्टनंतर लगेचच अंबिकेश महापात्रा यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आज तब्बल 11 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अंबिकेश महापात्राची त्या खटल्यातून सुटका झाली. या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर अंबिकेश महापात्रा म्हणाले, 'या खटल्यातून खूप आधी निर्दोष मुक्तता व्हायला हवी होती. पण राज्याच्या सत्ताधारी पक्षाने ते रोखले. ते न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही धमकावण्यापासून थांबले नाही. त्यांनी न्यायाधीशांना रद्द झालेले कलम लावून केस चालू ठेवण्यास भाग पाडले. डिसेंबर 2021 मध्ये मी पुन्हा अपील केले. त्या खटल्यातील सुनावणीच्या 1 वर्षानंतर त्यांनी मला सोडण्याचे आदेश दिले. यामध्ये सत्याचा विजय झाला आहे. हे प्रकरण भविष्यात अभूतपूर्व ठरेल'.

हेही वाचा : Wrestlers Protest : ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात खेळाडू का करत आहेत आंदोलन? जाणून घ्या संपूर्ण विवाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.