ETV Bharat / bharat

'लष्कर ए तोयबा'च्या टॉप कमांडरसहीत 3 दहशतवादी ठार

पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक झाली. या चकमकीत तीन अतिरेक्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. 2021 मध्ये सुरक्षा दलांनी तब्बल 88 अतिरेकी ठार मारले आहेत. यातील एकट्या जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात 16 जणांना कंठस्नान घातले. आतापर्यंत दहशतवाद संबंधित विविध घटनांमध्ये सुरक्षा दलातील 19 जवान हुतात्मा झाले आहेत.

Pulwama
पुलवामा
author img

By

Published : Jul 14, 2021, 8:46 AM IST

पुलवामा (जम्मू आणि काश्मीर) - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांच्या दरम्यान चकमक झाली. यात तीन अतिरेक्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. यात 'लष्कर ए तोयबा'चा टॉप कमांडर एजाज उर्फ अबू हुरैरा याचा समावेश आहे.

अतिरेकी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाने घेराव घातला. दहशतवाद्यांनी गोळीबार केला असता जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले.

तीन अतिरेक्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश

2021 मध्ये सुरक्षा दलांनी तब्बल 88 अतिरेकी ठार मारले आहेत. यातील एकट्या जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात 16 जणांना कंठस्नान घातले. आतापर्यंत दहशतवाद संबंधित विविध घटनांमध्ये सुरक्षा दलातील 19 जवान हुतात्मा झाले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या प्रदेशात शांती प्रस्थापित करणं अवघड आहे. पाकिस्तान आणि फुटिरतावादी या दोन घटकांमुळे या भागात कायम तणाव राहिला आहे. खोऱ्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेल्या कित्येक दशकांपासून करण्यात येत आहेत. मात्र, दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये सुरक्षा दलांनी शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच, बऱ्याच दहशतवाद्यांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी आत्मसमर्पणही केलं आहे.

जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी घटनांना आळा घालणे' हे मुख्य कारण पुढे करुनच केंद्राने कलम ३७० आणि ३५ अ हटवले होते. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील नेते केंद्रावर लोकशाहीची गळचेपी केली केल्याचा आरोप करत आहेत. विशेष म्हणजे नुकतेच जम्मू काश्मीरच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक पार पडली. ही बैठक अगदीच पूर्वनियोजित आणि आश्चर्यकारक होती. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचं वचन केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र, ते पूर्ण होताना दिसत नसल्याचा आरोप काश्मीरमधील बहुतांश राजकीय नेते करत होते. या दृष्टीने ही बैठक अधिक महत्त्वपूर्ण ठरली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.