श्रीनगर - जम्मू -काश्मीरमधील वार्षिक अमरनाथ यात्रा समारोप पूजनाने संपन्न झाली आहे. जम्मू -काश्मीरमध्ये शांतता, सौहार्द, प्रगती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केल्याचे एसएएसबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नितीश्वर कुमार यांनी म्हटलं.
महंत दीपेंद्र गिरी यांनी दशनामी आखाड्याच्या संतांसह मिरवणुकीचे नेतृत्व केले आणि सावन पौर्णिमेच्या (रक्षाबंधन) निमित्ताने यात्रेची सांगता झाली. कोरोनाच्या संकटात हिमालयाच्या उंच उंच भागात 3880 मीटर उंचीवर असलेल्या भगवान शिवच्या गुफा मंदिरात मंडळाने दक्षिण सर्व धार्मिक विधी पार पाडले. भक्तांसाठी सकाळ आणि संध्याकाळची आरती टीव्हीवर थेट प्रसारित करण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.
अमरनाथ यात्रेची देशभरातील भाविक वर्षभर प्रतीक्षा करत असतात. भाविकांची अमरनाथ यात्रा सुखकर करण्यासाठी श्राइन बोर्ड संपूर्ण व्यवस्था करत असते. दरवर्षी जून महिन्यात या ठिकाणी अमरनाथ यात्रेचं आयोजन करण्यात येतं. देशाच्या तसंच जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात.
जम्मू-काश्मीर राज्यातील हा भाग अतिरेकी कारवायांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. दरवर्षी अतिरेक्यांच्या हिंसाचारात काही भाविक मारले जातात. परंतु तरीही मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. घातपाताची शक्यता सतत असल्याने मार्गामध्ये जागोजागी भारतीय लष्कराचे जवान तैनात असतात. कोरोनामुळेही यात्रा रद्द करावी लागली होती.
गुहेकडे जाण्यासाठी मुख्यत्वे दोन रस्ते -
पहिला मार्ग सोनमर्ग - बालताल- अमरनाथ च्या बाजूने आहे. हा रस्ता फक्त १३ किमी चा असून बहुंताशी भाविक याच मार्गाने येणे पसंत करतात. दुसरा मार्ग पहेलगाम - चंदनवाडी- पिस्सुटॉप- शेषनाग-पंचतरणी- अमरनाथ असा आहे. हा मार्ग ४५-५० किमीचा असून जास्त खडतर आहे. परंतु हिमालयाचे विलोभनीय दर्शन या मार्गात होते म्हणून अनेक जण हा मार्ग निवडतात.
हेही वाचा - अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था रवाना; सोमवारी घेतील बाबा बर्फानींचे दर्शन
हेही वाचा - अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; शांततेत यात्रा पार पाडण्यासाठी लष्कर सज्ज
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची अमरनाथ यात्रा रद्द - सूत्र