रोम : युरोपीय संसदेने नवीन वाहनांसाठी सीओ2 उत्सर्जन कमी करण्यासाठी लक्ष्य निश्चित केले आहे. मात्र यावर इटलीच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांनी युरोपीय संसदेने घेतलेल्या या निर्णयावर टीका केली. हे लक्ष्य अवास्तविक असल्याचे या मंत्री आणि अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. युरोपीय संसदेने 2035 पासून कार्बन उत्सर्जन करणाऱ्या वाहनांवर बंदीचा निर्णय घेतल्याने आता या निर्णयावर टीका करण्यात येत आहे.
युरोपीय संघाने कार्बन उत्सर्जक वाहनांवर बंदी : युरोपीय संघाने 2035 पासून कार्बन उत्सर्जक डीजल आणि गॅस वाहनांच्या विक्रीवर प्रतिबंध लावला आहे. युरोपीय आयोगाने मंगळवारी नवीन जास्त किंमतीच्या वाहनांवर महत्वाकांक्षी सीओ2 उत्सर्जन लक्ष्य प्रसात्वित केला आहे. त्यानुसार 2019 च्या तुलनेत 2040 पर्यंत भारी आणि मोठ्या ट्रकसाठी ग्रीनहाऊस उत्सर्जन 90 टक्के कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. युरोपीय संघाने घेतलेला निर्णय यावेळी लागू करण्यास धोका असल्याचे इटलीचे उद्योग मंत्री एडॉल्फो उर्सो यांनी सांगितले. युरोप आमच्यावर जो निर्णय थोपवू पाहत आहे, तो इटलीत योग्य नसल्याचे बुधवारी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
ही योजना फक्त कागदावर चांगली आहे : युरोपीय संसदेने घेतलेला निर्णय इटलीतील अनेका मंत्री आणि अधिकाऱ्यांना योग्य वाटला नाही. त्यांनी या निर्णयावर सडकून टीका केली. इटलीचे विदेश मंत्री एंटोनियो ताजानी यांनीही बुधवारी यावर टीका केली. मी इलेक्ट्रीक कारचा मोठा समर्थक आहे. मात्र महत्वाकांक्षी लक्ष्याला वास्तवात पूर्ण करायला हवे, कागदावर नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे युरोपीय संसदेच्या या निर्णयाला इटलीतील अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांचा विरोध असल्याचे स्पष्ट होत आहे.
युरोपीय उद्योगाला जागतिक पातळीवर कमी प्रतिस्पर्धी : वाहनांच्या बाबतीत युरोपीय संसदेने घेतलेल्या निर्णयावर अनेकजण टीका करत आहेत. इटलीचे उपपंतप्रधान माटेओ साल्विनी यांच्यासह परिवहन मंत्री यांनी युरोपीय उद्योगाला जागतिक पातळीवर कमी प्रतिस्पर्धी राहतील. त्यामुळे काही जणांनी हा निर्णय चांगला असल्याची प्रतिक्रियाही दिली. युरोपीयन ऑटोमोबाईल्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या नवीन आकडेवारीनुसार 2022 मध्ये युरोपीय संघात विकलेल्या 12 टक्के कार या ईलेक्ट्रीक होत्या. युरोपीयन युनियनच्या या प्रयत्नाला पर्यावरण समुहाने प्रशंसा केल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
हेही वाचा - Most Expensive VVIP Number For Scooty : होऊ दे खर्च; स्कुटीच्या व्हिव्हिआयपी नंबरसाठी पठ्ठ्याने मोजले तब्बल एक कोटी रुपये