ETV Bharat / bharat

ओडिशात आयटीचा छापा; 300 कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त

IT raid in Odisha : आयकर विभागानं ओडिशातील दोन कंपन्यांच्या जागेवर छापे टाकले. या काळात मोठ्या प्रमाणात चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत 300 कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

IT raid in Odisha
ओडिशात आयटीचा छापा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 1:45 PM IST

संबलपूर : IT raid in Odisha दोन कंपन्यांच्या कथित करचुकवेगिरीच्या संदर्भात छापे मारताना आयकर विभागानं 300 कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. एवढी रक्कम पाहून प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांवरदेखील थक्क होण्याची वेळ आली. अनेक दारू कंपन्यांनी मिळकत कर चुकवल्याच्या आरोपावरून बुधवारी राज्याच्या विविध भागात आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले.

  • पश्चिम ओडिशातील सर्वात मोठ्या देशी दारू निर्मिती आणि विक्री कंपन्यांपैकी एक असलेल्या बलदेव साहू अँड ग्रुप ऑफ कंपनीजच्या बालंगीर कार्यालयावर छापा मारताना 150 कोटींहून अधिक रोख जप्त करण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबलपूर कॉर्पोरेट कार्यालयात छापेमारी करताना 150 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.
  • Income Tax (I-T) Department conducted raids at Boudh Distilleries Private Limited in Odisha and Jharkhand and recovered huge cache of currency notes from the premises linked to the company till yesterday. According to officials searches are going at Bolangir & Sambalpur in Odisha… pic.twitter.com/A5SWUdDNUm

    — ANI (@ANI) December 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दारूच्या डिस्टिलरीवर छापा : प्राथमिक माहितीनुसार बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची भागीदारी फर्मवर आयकर विभागानं छापे टाकले होते. बुधवारी आयकर पथकाने सुंदरगढमधील मद्य व्यावसायिक राजकिशोर प्रसाद जैस्वाल यांच्या सरगीपली येथील घर, कार्यालय आणि देशी दारूच्या डिस्टिलरीवर छापा टाकला होता. पलासपल्ली येथील बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडचे ​​कॉर्पोरेट कार्यालय आणि काही अधिकाऱ्यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले.

कार्यालयावरही छापे : कंपनीचा कारखाना आणि बौद्ध रामभिक्‍ता येथील कार्यालयावरही छापे टाकण्यात आले आहेत. कंपनीशी संबंध असल्याचा आरोप करत आयकर पथकाने कटक येथील बौद्धपुरुणा येथील व्यापारी अशोक कुमार अग्रवाल यांच्या राइस मिल, निवासस्थान आणि इतर ठिकाणांवर छापे टाकले आहेत. दुसरीकडे बलांगीर आणि तितलागडमध्ये अनेक मद्यविक्रेते रडारवर आले. आयकर विभागाच्या 30 सदस्यीय पथकाने मद्यविक्रेते संजय साहू आणि दीपक साहू यांच्या घरावर तसेच दारूच्या दुकानावर छापा टाकला. आयटी टीम कोलकाता आणि रांचीलाही गेल्याचे सांगण्यात आले. तपासात आल्यानंतर कंपनीच्या अनेक संचालक आणि एमडींवर छापे टाकण्यात आले. बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड किंवा इतर कोणत्याही भागीदार कंपन्यांकडून आयकर छाप्याबाबत कोणती प्रतिक्रिया मिळाली नाही.

हेही वाचा :

  1. पतीनं पत्नीवर केला बलात्कार; न्यायालयाच्या आदेशानंतर 5 महिन्यांनी गुन्हा दाखल
  2. सुखदेव सिंह गोगामेडी हत्या प्रकरणात मोठी अपडेट, एफआयआरमध्ये पोलीस अधिकाऱ्यासह काँग्रेसमधील सर्वात मोठ्या 'या' नेत्याचं नाव
  3. कुरुक्षेत्रात भव्य गीता महोत्सवाचे आयोजन, 24 राज्यातील कारागीर होणार सहभागी, 18 हजार मुले करणार गीता मंत्राचा जप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.