भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO), भारत सरकारच्या अंतराळ विभागांतर्गत, पदवीधरांसाठी 500 हून अधिक सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इस्रोने 20 डिसेंबर 2022 रोजी भरती अधिसूचना जारी केल्यानंतरच या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इस्रोद्वारे जारी केलेल्या पदांमध्ये सहाय्यक, कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, अप्पर डिव्हिजन क्लर्क आणि स्टेनोग्राफरच्या एकूण 526 पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आज 16 जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे इच्छूक उमेद्वारांना आजच नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर फक्त नोंदणीकृत उमेदवारच अर्ज शुल्कासह 18 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करु शकतील.
आज अर्ज करण्याची अंतिम तारीख : इस्रोमधील विविध पदांंच्या भरतीसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या अशा उमेदवारांनी संस्थेने जारी केलेल्या भरती अधिसूचनेत विविध पदांसाठी विहित केलेले पात्रता निकष तपासणे आवश्यक आहे. अधिसूचनेनुसार इस्रो सर्व पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवी म्हणून निश्चित केली आहे. शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त, उमेदवारांनी पदांनुसार विविध व्य्वसायिक पात्रता आणि कौशल्ये आत्मसात केलेली असावीत, ज्याची माहिती इस्रो भरती 2023 च्या अधिसूचनेमध्ये मिळू शकते. याव्यतिरिक्त उमेदवारांचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जेथे अर्जच्या शेवटच्या तारखेनुसार वय मोजले जाईल. तसेच उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2023 ही होती. जी 16 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच गणना करण्याची तारीख 9 जानेवारी राहील.
या पदांवर भरती : इंडियन रिसर्च स्पेस ऑर्गनायझेशनच्या या भरती मोहिमेद्वारे, सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, लघुलेखक अशा एकूण 522 पदांची भरती केली जाणार आहे. यालसाठी अर्ज केवळ ऑनलाईन करता येईल. यासाठी, उमेदवारांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी – isro.gov.in
रिक्त जागा तपशील : यासाठी एकूण 522 पदांसाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये सहाय्यक – ३३९ पदे, कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक – १५३ पदे, अप्पर डिव्हिजन क्लर्क – १६ पदे, स्टेनोग्राफर – १४ पदे आहेत.
पात्रता काय असणार : किमान ६० टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेले उमेदवार असिस्टंट आणि अप्पर डिव्हिजन क्लर्कसाठी अर्ज करू शकतात. त्यांना संगणकाचेही ज्ञान असले पाहिजे. दुसरीकडे, ज्युनियर पर्सनल असिस्टंट आणि स्टेनोग्राफर या पदांसाठी ६० टक्के गुणांसह पदवी व्यतिरिक्त, व्यावसायिक किंवा सचिवीय प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. यासोबतच त्यांना कॉम्प्युटरचा वापर आणि टायपिंगची माहिती असावी. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 9 जानेवारी 2023 रोजी 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अशी होईल निवड : लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीद्वारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. प्रथम लेखी परीक्षा होईल, त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणी द्यावी लागेल. तसेच या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला १०० रुपये शुल्क भरावे लागेल.