ETV Bharat / bharat

इस्रोने तयार केले तीन प्रकारचे व्हेंटिलेटर; तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यासही उत्सुक - Vikram Sarabhai Space Centre- VSSC

या व्हेंटिलेटर्सपैकी 'प्राण' हा अगदीच स्वस्त आणि पोर्टेबल आहे. हा एएमबीयू बॅगेला स्वबळावर सुरू ठेवतो. यामध्ये अत्याधुनिक नियंत्रण प्रणाली आहे. याव्यतिरिक्त इस्रोने 'वायू' आणि 'स्वस्त' असे दोन व्हेंटिलेटर बनवले आहेत.

isro-develops-three-types-of-ventilators-intends-to-transfer-technology
इस्रोने तयार केले तीन प्रकारचे व्हेंटिलेटर; तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यासही उत्सुक
author img

By

Published : Jun 7, 2021, 8:34 PM IST

बंगळुरू : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) तीन प्रकारचे व्हेंटिलेटर विकसित केले आहेत. याच्या वैद्यकीत वापरासाठी त्यांनी ही टेक्नॉलॉजी हस्तांतरित करण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना, इस्रोच्या या संशोधनाचा मोठा फायदा होणार आहे.

विविध फीचर्स असलेला 'प्राण'..

या व्हेंटिलेटर्सपैकी 'प्राण' (Programmable Respiratory Assistance for the Needy Aid- PRANA) हा अगदीच स्वस्त आणि पोर्टेबल आहे. हा एएमबीयू बॅगेला स्वबळावर सुरू ठेवतो. यामध्ये अत्याधुनिक नियंत्रण प्रणाली आहे. तसेच, एअरवे प्रेशर सेन्सर, फ्लो सेन्सर आणि ऑक्सिजन सेन्सरही आहेत. तसेच, याला असलेल्या टच स्क्रीन पॅनलच्या मदतीने व्हेंटिलेशनचे विविध प्रकार निवडता येतात. एवढेच नव्हे, तर वीजपुरवठा खंडित झाल्यास अतिरिक्त बॅटरीचीही व्यवस्था या व्हेंटिलेटरमध्ये करण्यात आली आहे.

तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यास उत्सुक..

याव्यतिरिक्त इस्रोने 'वायू' (Ventilation assist Unit - VaU) आणि 'स्वस्त' (Space Ventilator Aided System for Trauma Assistance- SVASTA) असे दोन व्हेंटिलेटर बनवले आहेत. तिरुवअनंतपुरमच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये या व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्यात आली आहे. याच्या वैद्यकीय वापरास चालना मिळावी म्हणून इस्रो याच्या तंत्रज्ञानाचे उद्योगांना आणि स्टार्टअप्सना हस्तांतरण करण्यासही तयार आहे.

हेही वाचा : दिल्ली विमानतळावर दोन अफगाणी नागरिकांना अटक; १३६ कोटींचे 'हेरॉईन' जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.