नवी दिल्ली - देशभरात विविध भागात थंडी वाढली आहे. कडाक्याच्या थंडीबरोबर धुके पडत आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेकडून विविध झोनमधील 24 जानेवारी 2022 रोजी एकूण 542 पूर्ण किंवा अंशतः रद्द करण्यात ( cancelled trains list ) आले. 494 गाड्या पूर्णपणे आणि 48 गाड्या अंशतः रद्द करण्यात आले.
542 गाड्या रद्द -
तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर आधी IRCTC ( इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ) वर जाऊन तुम्ही प्रवास करणारी रेल्वे सुरू आहे का तपासा. IRCTC वर तुम्हाला तुमच्या रेल्वेची संपूर्ण माहिती मिळेल. 542 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
धुक्यामुळे अनेक गाड्या रद्द -
कडाक्याच्या थंडीबरोबरच अनेक ठिकाणी ट्रॅकच्या दुरुस्तीचे कामही सुरू आहे. त्यामुळे रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या मदत कक्षाच्या अधिकृत वेबसाइटवर रेल्वेने याबाबत माहिती दिली आहे.
हेही वाचा - Fire in Chemical Factory Kolhapur : इचलकरंजी येथील टेक्स्टाईल पार्कमधील केमिकल फॅक्टरीला आग