नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी दिल्लीत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅली हिंसाचाराप्रकरणी इक्लाब सिंगला आज (बुधवार) न्यायालयात हजर केले जाणार आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात त्याला आणण्यात येणार आहे. पंजाबमधील होशियारपूरमधून पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला ९ फेब्रुवारीला अटक केली होती.
हिंसाचारानंतर झाला होता फरार -
२६ जानेवारीला दिल्लीत हिंसाचार झाल्यानंतर इक्बाल सिंह फरार होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर ५० हजारांचे बक्षिस ठेवले होते. ९ फेब्रुवारीला अटक केल्यानंतर त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणातील दुसरा एक आरोपी सुखदेव सिंग याला दिल्ली पोलिसांनी चंदीगढमधून अटक केली होती.
जमावाला भडकावल्याचा आरोप -
ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झालेल्या जमावाला भडकावल्याचा आरोप इक्बाल सिंग, अभिनेता दिप सिधू आणि सुखदेव सिंग यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मोर्चा नियोजित मार्गावरून जात असताना या आरोपींनी जमावाला लाल किल्ल्याच्या दिशेने जाण्यास चिथावणी दिली. तसेच लाल किल्ल्यावर धूडगूस घालून झेंडा फडकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.