ETV Bharat / bharat

International Yoga Day 2023 : आंतरराष्ट्रीय योग दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व... - भारतीय संस्कृती

योगाचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा केला जातो. शतकानुशतके योग हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याला उपचार करण्याचे प्रभावी माध्यम मानले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेला प्रस्ताव स्वीकारून संयुक्त राष्ट्र महासभेने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला.

International Yoga Day 2023
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023
author img

By

Published : Jun 2, 2023, 2:41 PM IST

Updated : Jun 21, 2023, 6:42 AM IST

हैदराबाद : निरोगी आयुष्यासाठी योगासन खूप महत्वाचे आहे. योगामुळे शरीरात उर्जेचा संचार होतो आणि ते निरोगी राहण्यास मदत होते. योगाचे हे महत्त्व समजावून सांगण्यासाठी 21 जून रोजी देशात आणि जगात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. खरं तर, योग हा शतकानुशतके भारतीय संस्कृतीचा एक विशेष भाग आहे आणि तो बरे करण्याचे एक प्रभावी साधन मानले गेले आहे. भारताच्या पुढाकाराने योगाची ताकद ओळखून जगभरात योगाला महत्त्व दिले जाते. यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला.

अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात झाली : आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत एक प्रस्ताव ठेवला होता. ज्यामध्ये वर्षातील कोणत्याही एका दिवसाचे नाव योग असे म्हटले होते. पंतप्रधानांचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने स्वीकारला. ठराव मंजूर झाल्याने दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा करण्यात आला. ज्याचे नेतृत्व भारताने केले. या दिवशी दिल्लीतील राजपथावर 35,000 हून अधिक लोकांनी योगा केला, ज्यामध्ये 84 देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. या घटनेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जूनलाच का साजरा केला जातो ? 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे कारण खूप खास आहे. वास्तविक हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. लोक याला ग्रीष्म संक्रांती देखील म्हणतात. भारतीय परंपरेनुसार उन्हाळ्याच्या संक्रांतीनंतर सूर्य दक्षिणायनमध्ये असतो. या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर सर्वात जास्त काळ राहतात. जे आरोग्य आणि जीवनाशी प्रतीकात्मकपणे जोडलेले दिसते. म्हणूनच हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा उद्देश काय आहे ? आंतरराष्ट्रीय योग दिनाचे मुख्य उद्दिष्ट लोकांमध्ये योगाभ्यासाबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे. जेणेकरून लोक नियमितपणे योगाभ्यास करण्यासाठी वेळ काढू शकतील. खर तर आजच्या जीवनशैलीत शारीरिक हालचालींच्या कमतरतेमुळे बहुतेक लोक शुगर, रक्तदाब आणि इतर अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. यापासून मुक्त होण्यासाठी आणि स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी योग हे उत्तम माध्यम असू शकते.

हेही वाचा :

  1. World Brain Tumor Day 2023 : जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस 2023; जाणून घ्या लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध...
  2. World Bicycle Day 2023 : जागतिक सायकल दिन 2023; सायकल चालवणे आरोग्य आणि पर्यावरणासाठी आहे फायदेशीर
  3. World Digestive Health Day 2023 : जागतिक पाचक आरोग्य दिन 2023; जाणून घ्या थीम, इतिहास आणि महत्त्व

Last Updated : Jun 21, 2023, 6:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.