ETV Bharat / bharat

International Women’s Day 2023 : 'या' थीमवर साजरा होणार वर्ष 2023 चा महिला दिवस - Innovation and Technology for Gender Equality

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या हक्क चळवळीचा एक केंद्रबिंदू आहे. जो लैंगिक समानता, पुनरुत्पादक अधिकार आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या समस्यांकडे लक्ष वेधतो. यावर्षी युनायटेड नेशन्सच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम 'डिजिटॉल: लैंगिक समानतेसाठी नवकल्पना आणि तंत्रज्ञान' ही आहे. यंदा 8 मार्च बुधवार रोजी, आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केल्या जाईल.

International Women’s Day 2023
जागतिक महिला दिन 2023
author img

By

Published : Feb 22, 2023, 2:10 PM IST

हैदराबाद : आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा दरवर्षी '8 मार्च' ला साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांचा प्रचार करणे आणि महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देणे, असा उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या हक्क चळवळीचा एक केंद्रबिंदू आहे. जो लैंगिक समानता, पुनरुत्पादक अधिकार आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या समस्यांकडे लक्ष वेधतो. याशिवाय, आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक यशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो; तसेच स्त्रियांबद्दल आदर, कौतुक आणि प्रेम दर्शवितो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन एका विशिष्ट थीमवर आधारित असतो.

दिवसाचा उद्देश : आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यामागील उद्देश हा आहे की, महिलांना देखील सामान्य नागरिकांना दिले जाणारे सर्व अधिकार मिळावेत. महिला आणि सामान्य नागरिकांमधील भेदभाव नष्ट व्हावा या उद्देशातून हा दिवस साजरा होऊ लागला.

दिनाचा इतिहास : संयुक्त राष्ट्र संघाने ८ मार्च १९७५ रोजी महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली, परंतु त्याआधी १९०९ सालीच तो साजरा करण्यात करण्यात आला होता. 1909 साली अमेरिकेत पहिल्यांदा 28 फेब्रुवारीला महिला दिन साजरा करण्यात आला होता. अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने न्यूयॉर्कमध्ये 1908 च्या गारमेंट कामगारांच्या संपाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस निवडला. त्याचवेळी पहिल्यांदाच, 28 फेब्रुवारी रोजी महिला दिन साजरा करताना, रशियन महिलांनी पहिल्या महायुद्धाचा निषेध नोंदवला. तर 1917 मध्ये शांततेच्या मागणीसाठी रशियन महिला संपावर गेल्या. फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी संप सुरू झाला. हा ऐतिहासिक संप होता आणि रशियाच्या झारने सत्ता सोडली तेव्हा, तेथील अंतरिम सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला.

महिलांचे अधिकार : युरोपमधील महिलांनी 8 मार्च रोजी शांतता कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी रॅली काढल्या. त्यानंतर १९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर 'महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता' या हेतून साजरा करावा यासाठी आवाहन केले.

महिला दिनाची थीम : 2023 मध्ये, युनायटेड नेशन्सच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम 'डिजिटॉल: लैंगिक समानतेसाठी नवकल्पना आणि तंत्रज्ञान' ही आहे. या थीमच्या आधारावरच संपूर्ण कार्यक्रमांची रुपरेषा ठरवली जाणार आहे.

हेही वाचा : National Women's Day 2023: ... म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय महिला दिन, जाणून घ्या इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.