नागपूर - पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या ( State Assembly Election 2022 ) निकाल 10 मार्च रोजी ( State Assembly Election Result Date ) जाहीर होणार आहे. याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. त्यातही उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत ( BJP In UP Election 2022 ) मिळेल की समाजवादी पक्षाची सत्ता स्थापन करेल का या प्रश्नाचे उत्तर देखील मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या मते उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला नुकसान सहन करावे ( Praveen Togadia On UP Election ) लागणार आहे. भाजपा की राह आसन नाही अशा शब्दात त्यांनी भाजपला इशारा ( Praveen Togadia About BJP In UP Election ) दिला आहे. प्रवीण तोगडिया हे मध्य प्रदेशातील बालाघाट येथे एका कार्यक्रमासाठी जाण्यासाठी नागपुरात पोहोचले होते, त्यावेळी बोलत होते.
'भारताने उशीर केल्यामुळेचं एका विद्यार्थ्यांला आपला जीव गमावला'
शेतकरी आंदोलनासोबतच, कृषी उत्पादनाला हमी भाव दिला नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत, याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता असल्याचे तोगडिया म्हणाले आहेत. युक्रेनमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात उशीर झाला. युक्रेन-रशिया युद्धात भारताने तस्थस्थ राहण्याची भूमिका योग्यच आहे. युक्रेनमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम 15 फेब्रुवारीला सुरू करण्याची आवश्यकता होती, मात्र भारताने उशीर केल्यामुळेचे एका विद्यार्थ्यांला आपला जीव गमावला लागला आहे, असे तोगडिया म्हणाले. युक्रेनमध्ये उणे 10 डिग्री तापमानात विद्यार्थी शेकडो किलोमीटर पायी चालत आहे, हे निंदनीय असून विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढण्यासाठी मंत्र्यांनी तिथे जाऊन यंत्रणा राबवावी अशी मागणी ही प्रवीण तोगडिया यांनी केली.