ETV Bharat / bharat

Kedarnath Helicopter Crash: वैमानिकाला मोठा अनुभव तरीही एका मिनिटात होत्या चे नव्हते झाले... वाचा इनसाइड स्टोरी

author img

By

Published : Oct 19, 2022, 10:34 AM IST

Updated : Oct 19, 2022, 12:15 PM IST

केदारनाथ जवळील गरुडचट्टी (garud chatti) येथे मंगळवारी आर्यन कंपनीच्या हेलिकॉप्टरचा (aryan aviation helicopter) भीषण अपघात झाला. (Kedarnath Helicopter Crash). जाणून घ्या हेलिकॉप्टर अपघातापूर्वी आणि नंतर काय घडले ते सविस्तरपणे.

Kedarnath Helicopter Crash
Kedarnath Helicopter Crash

डेहराडून: केदारनाथ जवळील गरुडचट्टी (garud chatti) येथे मंगळवारी आर्यन कंपनीच्या हेलिकॉप्टरचा (aryan aviation helicopter) भीषण अपघात झाला. (Kedarnath Helicopter Crash). या अपघातात वैमानिकासह 7 यात्रेकरूंना प्राण गमवावे लागले आहेत. जाणून घ्या हेलिकॉप्टर अपघातापूर्वी आणि नंतर काय घडले ते सविस्तरपणे. अपघात एवढा भीषण होता की काही मृतदेह जागीच जळाले. अनेक मृतदेहांचे अवयव इकडे तिकडे विखुरले गेले. हेलिकॉप्टर अपघातापूर्वी आणि नंतर काय घडले ते सविस्तरपणे वाचा.

सकाळी 11.30 ला केदारनाथला रवाना: मंगळवारी सकाळी 11:30 वाजता हेलिकॉप्टरने गुप्तकाशीहून केदारनाथसाठी उड्डाण घेतले. हे हेलिकॉप्टर सकाळी 11.39 वाजता केदारनाथला पोहोचले. यात्रेकरूंना तेथे उतरवल्यानंतर हेलिकॉप्टर केदारनाथ येथे तीन मिनिटे थांबले. त्यानंतर 11:42 वाजता 6 यात्रेकरूंसह हेलिकॉप्टर गुप्तकाशीच्या दिशेने निघाले.

परतीच्या उड्डाणात एक मिनिटानंतर घडला अपघात: सकाळी 11.42 वाजता हेलिकॉप्टरने ६ यात्रेकरूंना घेऊन केदारनाथहून गुप्तकाशीसाठी उड्डाण घेतले. मात्र टेक-ऑफच्या एका मिनिटानंतर, म्हणजे 11:43 वाजता, केदारनाथ हेलिपॅडपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गरुडचट्टी देवदर्शनीजवळ हेलिकॉप्टरमध्ये मोठा स्फोट झाला. त्यानंतर हेलिकॉप्टर खड्ड्यात पडले. हेलिकॉप्टर निवृत्त ले. कर्नल अनिल कुमार हे उडवत होते. अनिल कुमार यांना ४८०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव होता. केदार व्हॅलीमध्येही ते 2018 पासून सातत्याने सेवा देत होते.

यांचा झाला मृत्यू: आर्यन कंपनीच्या या हेलिकॉप्टर अपघातात पायलटसह सात जणांना आपला जीव गमवावा लागला. आर्मी एव्हिएशनचे निवृत्त लेफ्टनंट कर्नल पायलट, जे हेलिकॉप्टर उडवत होते, ते मुंबईचे रहिवासी होते. बाबा केदारनाथच्या दर्शनानंतर परतणाऱ्या तामिळनाडू आणि गुजरातमधील सहा यात्रेकरूंचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. अपघातात एका दाम्पत्यासह पाच महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

पायी जाणाऱ्या प्रवाशांनी दिली अपघाताची माहिती: केदारनाथला पायी जाणाऱ्या प्रवाशांना प्रथम केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताची माहिती मिळाली. या यात्रेकरूंनी तातडीने पोलिसांना हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस-प्रशासन, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पथक अपघातस्थळी पोहोचले.

दाट धुक्यामुळे झाला अपघात: दाट धुके हे अपघाताचे प्राथमिक कारण असल्याचे सांगितले जात आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. मात्र हा अपघात इतका भीषण होता की अपघातात कोणीही वाचू शकले नाही. अपघात झालेले ठिकाण अत्यंत दुर्गम असूनही एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन पथके अपघातस्थळी त्वरीत पोहोचले. मात्र सततचा पाऊस आणि बर्फवृष्टी यामुळे आपत्ती निवारण कार्यात अडचण निर्माण होत आहेत.

अपघाताच्या चौकशीचे आदेश: अपघातावर दु:ख व्यक्त करत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य पूर्ण होईपर्यंत हेलीकॉप्टर सेवा बंद ठेवण्यात आली होती. आजपासून ती सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीत होणार आहे. नागरी विमान वाहतूक विभागाचे अतिरिक्त सचिव आणि उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरण (यूसीएडीए) चे मुख्य कार्यकारी अधिकारी सी रविशंकर यांनी सांगितले की, डीजीसीएची टीम तपासासाठी डेहराडूनला पोहोचली आहे. आज सकाळी पथक घटनास्थळी जाणार आहे.

केदारनाथ यात्रेबाबत प्रचंड उत्साह: कोरोना नंतर 2 वर्षांत प्रथमच ही यात्रा होत असल्याने यात्रेकरूंमध्ये यात्रेबाबत प्रचंड उत्साह आहे. या वर्षी आतापर्यंत 142,100 प्रवाशांनी केदारनाथला भेट दिली आहे. या वर्षात आतापर्यंत या शटलने 26,639 उड्डाण केले आहेत. रोजची सरासरी घेतली तर हेली सेवा दररोज 250 च्या जवळपास उड्डाण करत आहेत.

Last Updated : Oct 19, 2022, 12:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.