ETV Bharat / bharat

भाजपा सरकारमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय - अखिलेश यादव

समाजवादी पक्षाने सुरू केलेल्या शेतकरी घेरा कार्यक्रमाच्या दुसर्‍या दिवशी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. अखिलेश यादव म्हणाले की, भाजप सरकारमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. भाजपने शेतकऱ्यांचा नाश करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.

अखिलेश यादव
अखिलेश यादव
author img

By

Published : Dec 26, 2020, 9:45 PM IST

उत्तर प्रदेश (लखनऊ) - 25 डिसेंबरपासून राज्यातील सर्व जिल्ह्यात समाजवादी पक्षाने घेराव कार्यक्रम सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या दुसर्‍या दिवशी राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप सरकारमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. भाजपाने शेतकर्‍यांचा नाश करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. भाजपची आर्थिक धोरणे कॉर्पोरेट व्यापाऱ्यांच्या बाजूने आहेत.

शेतकऱ्यांकडून शेत हिसकवण्याचे षडयंत्र-

अखिलेश यादव म्हणाले की, भाजप सरकार कंत्राटी शेतीच्या नावाखाली शेतकर्‍यांची शेती हिसकावू इच्छित आहे. भाजपने शेतकऱ्यांना जे काही आश्वासने दिली होती, ती एकसुद्धा पूर्ण केली नाहीत. भाजपच्या नवीन कृषी कायद्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. केंद्र सरकारने नवीन कृषी कायदा मागे घ्यावा. ना शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे, ना उसाला पैसे दिले जात आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावत आहेत.

राज्यातील जनता 2022 मध्ये उत्तर देइल-

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव सतत सरकारवर निशाणा साधत असतात. कधी कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर, तर कधी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर, अखिलेश यादव केंद्र व राज्य सरकारवर टिका करत आहेत.यादव म्हणाले की, निश्चितपणे भाजपाच्या धोरणांमुळे प्रभावित लोक 2022 उत्तर देतील. शेतकरी घेरा कार्यक्रमाच्या दुसर्‍या दिवशी समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी भाजप सरकारमधील शेतकऱ्यांवरील अत्याचारांची माहिती शेतकऱ्यांना दिली.

हेही वाचा- नाथाभाऊ म्हणाले, 'आता इंग्लिशमधून पण सांगू का?'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.