ETV Bharat / bharat

White House : लस उत्पादनातील कामगिरीवरून भारताचे अमेरिकेकडून विशेष कौतुक - अमेरिकेकडून भारताचं कौतुक

कोरोना लसींच्या ( COVID 19 Vaccines ) उत्पादनाचा उल्लेख करत अमेरिकेकडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेदरम्यान, व्हाईट हाऊसचे ( White House ) कोविड-19 प्रतिसाद समन्वयक डॉ. आशिष झा म्हणाले की, उत्पादन क्षमतेमुळे भारत हा लसीचा मोठा निर्यातदार देश आहे.

Dr. Ashish Jha
डॉ आशिष झा
author img

By

Published : Oct 26, 2022, 1:15 PM IST

वॉशिंग्टन : कोविड महामारीशी लढताना भारताने जगाला आपल्या क्षमतेची जाणीव करून दिली आहे. कोरोना विषाणूच्या आजारादरम्यान भारत जगाला कोविड-19 लसींचा निर्यात करणारा देश होता. व्हाईट हाऊसनेही जागतिक स्तरावर कोविड-19 विरुद्ध लसींच्या ( COVID 19 Vaccines ) पुरवठ्यात भारताची महत्त्वाची भूमिका मान्य केली आहे. 26 ऑक्टोबर रोजी व्हाईट हाऊसचे ( White House ) कोविड-19 प्रतिसाद समन्वयक आशिष झा ( Dr. Ashish Jha ) यांनी व्हाईट हाऊसच्या पत्रकार परिषदेत भारताच्या लस निर्मिती क्षमतेची प्रशंसा केली आहे. भारत हा जगाला लसींचा प्रमुख निर्यातदार देश असल्याचे वर्णन करताना त्यांनी भारताची लस निर्मिती क्षमता 'अविश्वसनीय' असल्याचे म्हटले आहे.

भारत हा लसींचा प्रमुख निर्यातदार : मंगळवारी पत्रकारांना संबोधित करताना, व्हाईट हाऊसचे कोरोनाव्हायरस प्रतिसाद समन्वयक डॉ आशिष झा म्हणाले की भारत त्याच्या अविश्वसनीय उत्पादन क्षमतेमुळे लसींचा प्रमुख निर्यातदार आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. आशिष झा म्हणाले की, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका यांच्यात क्वाड भागीदारीतील धोरणात्मक सुरक्षा संवादामध्ये कोरोनाव्हायरस हा बिडेन प्रशासनासाठी एक प्रमुख विषय होता. डॉ. आशिष म्हणाले की, भारत हा जगासाठी लसींचा एक महत्त्वाचा उत्पादक देश आहे. स्वतःसाठी नाही. जगाला लस पुरवण्याच्या बायडेन प्रशासनाच्या निर्णयाचा बचाव करताना आशिष झा म्हणाले की अमेरिका सर्व कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना लस पुरवत राहील.

देशांमध्ये लसीकरण करणे आवश्यक : सुमारे 100 देश कोव्हॅक्सद्वारे मोफत लस प्राप्त करण्यास पात्र आहेत. अमेरिकेत येणारे कोरोनाचे सर्व प्रकार बाहेरील देशातून आले आहेत. इतर देशांसाठी आपले दरवाजे बंद करावेत हा चुकीचा विचार आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व देशांमध्ये लसीकरण करणे आवश्यक आहे. अमेरिकेचे जगाशी घट्ट नाते आहे. झा म्हणाले की, बिडेन यांनी मागील अमेरिकन अध्यक्षांप्रमाणे जागतिक आरोग्य क्षेत्रात काम केले आहे. अमेरिका आणि जगाच्या सुरक्षेसाठी 4.02 अब्ज युरोची मदत ही केवळ एक छोटी गुंतवणूक आहे.

भारताने गेल्या वर्षी 97 देशांना लस दिली : भारताने गेल्या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत जगातील 97 देशांना कोरोना लसीचे 11.54 कोटी डोस पुरवले होते. आपल्याकडे गेल्या वर्षी 16 जानेवारी 2021 रोजी कोरोना व्हायरस विरोधात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. या दिवसापासून भारताने लस मैत्री कार्यक्रमांतर्गत इतर देशांना लस निर्यात करण्यास सुरुवात केली. भारताने लस मैत्री कार्यक्रमांतर्गत आपल्या शेजारील देशांसह इतर अनेक गरीब देशांना अनुदान म्हणून लस पाठवली होती. यासोबतच अनेक देशांना ही लस विकण्यातही आली आहे. एवढेच नाही तर भारताने जागतिक आरोग्य संघटनेसाठी म्हणजेच WHO च्या कोवॅक्स कार्यक्रमासाठी ही लस उपलब्ध करून दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.