ETV Bharat / bharat

Global Hunger Index 2022: ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताची स्थिती पाकिस्तान पेक्षाही वाईट! - Global Hunger Index 2022

जागतिक भूक निर्देशांकात (ग्लोबल हंगर इंडेक्स) (Global Hunger Index) भारत 121 देशांपैकी 107 व्या क्रमांकावर आहे. भारताची स्थिती युद्धग्रस्त अफगाणिस्तान वगळता दक्षिण आशियातील इतर सर्व देशांपेक्षा वाईट आहे.

Global Hunger Index 2022
Global Hunger Index 2022
author img

By

Published : Oct 15, 2022, 1:09 PM IST

नवी दिल्ली: ग्लोबल हंगर इंडेक्स (Global Hunger Index) (GHI) हे जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर भूकेचे सर्वसमावेशक मोजमाप आणि मागोवा घेणारे एक मापक आहे. हंगर इंडेक्स स्कोअर हा चार घटक निर्देशकांच्या मूल्यांवर आधारित आहे - 1) कुपोषण 2) मुलांची वाढ 3) मुलांचे दुबळे होणे 4) बालमृत्यू

जीएचआय स्कोअरची (GHI score) गणना 100 पॉइंट स्केलवर केली जाते, जी भुकेची तीव्रता दर्शवते. या गणणेत शून्य हा सर्वोत्तम स्कोअर आहे (भूक नाही) तर 100 सर्वात वाईट आहे. भारताचा स्कोअर 29.1 असून हा स्कोर 'गंभीर' श्रेणीत मोडतो.

दक्षिण आशियात भारताच्या मागे फक्त अफगाणिस्तान: ग्लोबल हंगर इंडेक्सच्या या स्कोरमध्ये भारताचा क्रमांक 105 आहे जो श्रीलंका 64, नेपाळ 81, बांगलादेश 84 आणि पाकिस्तान 99 या देशांच्याही खाली आहे. युद्धग्रस्त अफगाणिस्तान हा दक्षिण आशियातील एकमेव देश आहे जो निर्देशांकात भारतापेक्षा वाईट स्थानावर आहे. अफगाणिस्तानाचा क्रमांक 109 आहे. पाच पेक्षा कमी गुणांसह चीन क्रमवारीत 1 ते 17 च्या दरम्यान असलेल्या देशांमध्ये आहे. भारतात मुलांचे दुबळे असण्याचे प्रमाण 19.3% आहे. हे प्रमाण 2014 मध्ये 15.1% तर 2000 मध्ये 17.15% एवढे होते. भारतात दुबळे असण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. याचे एक कारण भारतातील प्रचंड लोकसंख्येची सरासरी हे देखील असू शकते.

कुपोषणाचा दर वाढला, बालमृत्यु घटला: देशातील कुपोषणाचा दर 2018-2020 मध्ये 14.6% वरून वाढून 2019-2021 मध्ये 16.3% पर्यंत पोहचला आहे. जीएचआय नुसार, भारतात 224.3 दशलक्ष लोक कुपोषित आहेत. तर जगभरात हा आकडा 828 दशलक्ष एवढा आहे. भारताने इतर दोन निर्देशकांमध्ये सुधारणा दर्शविली आहे. 2014 ते 2022 दरम्यान मुलांच्या बौनत्वाचे प्रमाण 38.7% वरून 35.5% पर्यंत घसरले आहे तर त्याच कालावधीत बालमृत्यू देखील 4.6% वरून 3.3% पर्यंत घसरला आहे.

2022 चा जीएचआय स्कोर जगासाठी मध्यम: भारताचा जीएचआय स्कोअर 2014 च्या 28.2 वरून 2022 मध्ये 29.1 पर्यंत वाढला आहे, जो चांगला संकेत नाही. जरी जीएचआय हा वार्षिक अहवाल असला तरी वेगवेगळ्या वर्षांतील रँकिंगची तुलना करता येत नाही. 2022 च्या जीएचआय स्कोअरची तुलना 2000, 2007 आणि 2014 च्या स्कोअरशी केली जाऊ शकते. जागतिक स्तरावर अलिकडच्या वर्षांत भुकेविरुद्धची प्रगती खुंटली आहे. 2022 चा जीएचआय स्कोअर जगासाठी 'मध्यम' मानला जातो. जगाचा 2022 मधील 18.2 हा स्कोर 2014 मधील 19.1 पेक्षा थोडासाच सुधारित आहे.

भविष्यात आणखी भूक वाढण्याची शक्यता: भूकवाढीवर हवामान बदल, कोरोना महामारी यांसारख्या अतिव्यापी संकटांचा प्रभाव पडला आहे. तसेच युक्रेन युद्ध, ज्यामुळे जागतिक अन्न, इंधन आणि खतांच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे २०२३ मध्ये आणखी भूक वाढण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. अहवालानुसार, असे ४४ देश आहेत ज्यात भुकेची पातळी 'तीव्र' किंवा 'भयानक' आहे. कोणत्याही मोठ्या बदलांशिवाय 2030 पर्यंतचा जीएचआय मोजल्यास जवळपास 46 देश भूक कमी करणार नाहीत, असा अंदाज वर्तवल्या गेला आहे.

जीएचआय स्कोअरशी तुलना का केली जाऊ शकत नाही? : ग्लोबल हंगर इंडेक्सचे वरिष्ठ धोरण अधिकारी लॉरा रेनर यांनी मीडियाला सांगितले की, या वर्षीच्या जीएचआय स्कोअरची तुलना गेल्या वर्षीच्या स्कोअरशी नाही केली जाऊ शकत. ते म्हणाले की, जीएचआय स्कोअरचा प्रत्येक संच 5 वर्षांच्या कालावधीतील डेटा वापरतो. 2022 चा जीएचआय स्कोअर 2017 ते 2021 पर्यंतचा डेटा वापरून मोजला जातो, 2014 चा स्कोअर 2012 ते 2016 पर्यंतचा तर 2007 चा स्कोअर हा 2005 ते 2009 मधील डेटा वापरून मोजला जातो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.