मुंबई : निफ्टीने आज सकाळच्या सत्रात 19400 चा आकडा ओलांडला आहे. सेन्सेक्स 370 अंकांनी वधारला आहे. भारतीय शेअर बाजाराने आजपर्यंतचे सगळे विक्रम सोमवेरी तोडले आहेत. सेन्सेक्सने तब्बल 65 हजाराच्या पार उसळी घेतली आहे. निफ्टी देखील उच्चांकी अंकावर पोहोचल्याने शेअर धारकांना सोमवार मोठा लाभाचा दिवस राहिला आहे. बीएसईने 486.49 अंकांची उसळी घेत 65,205.05 अंकांची नवीन विक्रमी पातळी गाठली. त्याचवेळी निफ्टी देखील 19,322.55 अंकांच्या उच्चांकावर बंद झाला आहे. शेअर बाजारातील तेजी सोमवारी सलग चौथ्या व्यापार सत्रात सुरू राहिली.
या कंपन्यांच्या शेअरला मिळाला भाव : बीएसई सेन्सेक्स 486 अंकांनी उसळी घेत प्रथमच 65,000 अंकांच्या वर बंद झाला. बाजारातील मजबूती ही प्रामुख्याने जागतिक बाजारातील वाढ आणि परकीय भांडवलाचा ओघ चालू राहिल्याने होती. निर्देशांकात मजबूत भागीदारी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लि. बाजारालाही चांगली खरेदीची साथ मिळाली.
सलग तिसऱ्या दिवशी दोन्ही निर्देशांक विक्रमी उच्चांकावर : 30 शेअर्सचा सेन्सेक्स 486.49 अंकांनी म्हणजेच 0.75 टक्क्यांनी वाढून 65,205.05 अंकांच्या सार्वकालिक उच्चांकावर बंद झाला. व्यापारादरम्यान एका टप्प्यावर तो 581.79 अंकांनी झेप घेऊन विक्रमी 65 हजार 300.35 वर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 133.50 अंकांच्या म्हणजेच 0.70 टक्क्यांच्या वाढीसह विक्रमी 19 हजार 322.55 अंकांवर बंद झाला. व्यापारादरम्यान तो 156.05 अंकांनी झेप घेऊन 19,345.10 अंकांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता. सलग तिसऱ्या दिवशी दोन्ही निर्देशांक विक्रमी उच्चांकावर बंद झाले आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाव वाढला : सेन्सेक्स समभागांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वाधिक 2.53 टक्क्यांनी वाढला. याशिवाय आयटीसी, बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह आणि आयसीआयसीआय बँक यांनाही मोठा फायदा झाला. दुसरीकडे पॉवर ग्रिड, मारुती, लार्सन अँड टुब्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्रा, नेस्ले आणि टाटा मोटर्सचा समावेश आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई, चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग आशियातील इतर बाजारपेठांमध्ये नफ्यात राहिला. युरोपातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सुरुवातीच्या व्यापारात तेजी दिसून आली. शुक्रवारी अमेरिकन बाजार तेजीत होता. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 6,397.13 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.
मंदीची भीती कमी झाल्याने जागतिक बाजारात तेजी : मजबूत आर्थिक डेटा आणि मंदीची भीती कमी झाल्याने जागतिक बाजाराला पाठिंबा मिळाला आहे. भारताच्या शेअर बाजाराचा कल व्यापक आहे. याचे कारण म्हणजे ऊर्जा, आर्थिक, धातू आणि दैनंदिन वापराच्या वस्तू (MFCG) क्षेत्रांची चांगली कामगिरी असल्याचे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर व्यक्त केले. अर्थ मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार जूनमध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन 12 टक्क्यांनी वाढून 1.61 लाख कोटी रुपये झाले आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर ही चौथी वेळ आहे जेव्हा कर संकलन 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.
हेही वाचा -