हैदराबाद - नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (Commercial LPG Cylinder) दरामध्ये 100 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला खास दिलासा मिळणार आहे. इंडियन ऑइल (Inidan Oil) नवीन वर्षात लोकांना मोठी भेट दिली ( LPG Cylinder Price 1st January 2022 ) आहे.
इंडियन ऑइल (IOCL) नुसार, 1 जानेवारी 2022 रोजी दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 102 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आता दिल्लीत 1998.5 मध्ये 19 किलोचा गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहे. चेन्नईतील ग्राहकांना व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी 2131 रुपये आणि मुंबईत 1948.50 रुपये मोजावे लागतील. नवीन वर्षात कोलकातामध्ये 19 किलोचा गॅस सिलिंडर 2076 रुपयांना मिळणार आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यावेळीही घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.
घरगुती सिलेंडर बाबत कोणताही बदल नाही -
इंडियन ऑइलच्या मते, नवीन वर्षातही दिल्ली आणि मुंबईमध्ये 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची ( Domestic LPG Cylinder ) किंमत 900 रुपये आहे. कोलकात्याच्या लोकांना घरगुती सिलिंडरसाठी 926 रुपये मोजावे लागतील आणि चेन्नईच्या लोकांना 916 रुपये मोजावे लागतील. लखनऊमध्ये एलपीजी 938 रुपये प्रति सिलिंडर मिळेल. सध्या बिहारची राजधानी पाटणामध्ये गॅस महाग झाला आहे. तेथे घरगुती सिलिंडरची किंमत 998 रुपये आहे. अहमदाबादमध्ये एलपीजीची किंमत प्रति सिलिंडर 907 रुपये आहे. भोपाळमध्ये एलपीजी 906 रुपयांना उपलब्ध आहे.
हेही वाचा - Raosaheb Danve on CM : 'मुख्यमंत्री आजारी असतील तर एकनाथ शिंदे किंवा राष्ट्रवादीला संधी द्या'