नवी दिल्ली - रशियाने युक्रेनविरोधात युद्ध ( Ukraine-Russia conflict ) पुकारलं आहे. रशियन सैन्याविरोधात युक्रेनचे सैन्य निकाराने लढा देत आहेत. रशियाने सुरु केल्या या युद्धाचे पडसाद सुंपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. युक्रेनमधील युद्धग्रस्त भागातून भारतीय विद्यार्थी ( Indian Students In Ukraine ) आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या चार मंत्र्यांना युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या देशांमध्ये पाठवण्यात आले आहे.
-
'#OperationGanga in full gear!' Scindia meets Indian Ambassador to Romania, Moldova to discuss operational issues for evacuation
— ANI Digital (@ani_digital) March 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/XEyIsIjUjU#JyotiradityaScindia #Romania #Moldova #Ukraine #UkraineConflict pic.twitter.com/nv1pV2TBq6
">'#OperationGanga in full gear!' Scindia meets Indian Ambassador to Romania, Moldova to discuss operational issues for evacuation
— ANI Digital (@ani_digital) March 1, 2022
Read @ANI Story | https://t.co/XEyIsIjUjU#JyotiradityaScindia #Romania #Moldova #Ukraine #UkraineConflict pic.twitter.com/nv1pV2TBq6'#OperationGanga in full gear!' Scindia meets Indian Ambassador to Romania, Moldova to discuss operational issues for evacuation
— ANI Digital (@ani_digital) March 1, 2022
Read @ANI Story | https://t.co/XEyIsIjUjU#JyotiradityaScindia #Romania #Moldova #Ukraine #UkraineConflict pic.twitter.com/nv1pV2TBq6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सोमवारी युक्रेन संकटावर उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. काही केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाऊन निर्वासन मोहिमेत भूमिका बजावू शकतात, असे त्यांनी सुचवले होते. त्यानुसार निर्वासन मोहिमेत समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्हीके सिंग हे भारताचे विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये गेले आहेत.
ज्योतिरादित्य सिंधिया बुखारेस्ट, रोमानिया येथे पोहोचले आहेत. तर केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजिजू विशेष दूत म्हणून स्लोव्हाकियात पोहचले आहेत. याशिवाय, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी बुडापेस्ट, हंगेरी येथे पोहोचले. तर जनरल (निवृत्त) व्हीके सिंग हे पोलंडला पोहचले आहेत. हे चारही नेते भारताचे विशेष दुत म्हणून युक्रेनमधून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी सरकारमध्ये समन्वय साधण्याचे काम करत आहेत.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया रोमानियामध्ये कार्यभार सांभाळथ आहेत. त्यांनी भारतीय राजदूत राहुल श्रीवास्तव यांची भेट घेऊन बचाव कार्यावर चर्चा केली. येत्या काही दिवसांत, बुखारेस्ट आणि सुसेवा येथून चालवल्या जाणार्या निर्वासन आणि उड्डाणे याबद्दल सविस्तर चर्चाही केली. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. रोमानिया आणि मोल्दोव्हा येथील भारतीय राजदूत राहुल श्रीवास्तव यांची भेट घेतली आणि येत्या काही दिवसांत बुखारेस्ट आणि सुसेवा येथून निर्वासन आणि उड्डाण नियोजनासाठी ऑपरेशनल मुद्द्यांवर चर्चा केली, असे त्यांनी म्हटलं.
ऑपरेशन गंगा -
रशियन सैन्याने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर, भारत सरकारने युक्रेनमधून अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन गंगा' सुरू केले. 'ऑपरेशन गंगा' मिशन अंतर्गत विशेष उड्डाणे मोफत चालवली जात आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीय नागरिकांना घेऊन अशा प्रकारचे पहिले निर्वासन विमान 26 फेब्रुवारी रोजी मुंबईत दाखल झाले. अशी अनेक उड्डाणे आतापर्यंत भारतात दाखल झाली आहेत.