ETV Bharat / bharat

India Germany Bilateral Talk : एस जयशंकर यांनी जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली; द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर झाली चर्चा

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अॅनालेना बियरबॉक यांची सोमवारी भेट झाली. (S Jaishankar meets German Foreign Minister). या भेटीत दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 5, 2022, 7:45 PM IST

नवी दिल्ली : परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अॅनालेना बियरबॉक (Annalena Baerbock) यांनी सोमवारी ऊर्जा, व्यापार आणि हवामान बदलासह द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर तपशीलवार चर्चा केली. (S Jaishankar meets German Foreign Minister). बेअरबॉक दोन दिवसीय दौऱ्यासाठी सोमवारी भारतात पोहोचल्या. (India Germany Bilateral Talk). चार दिवसांपूर्वीच भारताने G20 गटाचे औपचारिक अध्यक्षपद स्वीकारल्या नंतर त्यांचा हा दौरा होतो आहे. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री बेयरबॉक यांनी भारत हा जर्मनीचा नैसर्गिक भागीदार असल्याचे म्हटले आहे.

भारताची भूमिका निर्णायक : त्या म्हणाल्या की, 21व्या शतकात इंडो-पॅसिफिक प्रदेशात जागतिक व्यवस्थेला आकार देण्यासाठी भारत निर्णायक भूमिका बजावेल. भारताचा प्रवास म्हणजे जगाच्या सहाव्या भागाचा प्रवास करण्यासारखे आहे. भारत सरकारने केवळ G20 मध्ये स्वत:साठी महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले नाही, तर आपल्या देशासाठीही लक्ष्य ठेवले आहे. जेव्हा अक्षय ऊर्जेच्या विस्ताराचा विचार केला जातो, तेव्हा भारताला ऊर्जेच्या वापरात पुढे जायचे आहे आणि यात जर्मनी भारताच्या पाठीशी उभा आहे.

भारतासोबतील संबंधात वृद्धी करायची आहे : बियरबॉक पुढे म्हणाल्या की, हवामान संकटाच्या परिणामामुळे आपण सर्व प्रभावित आहोत. युरोप आणि भारतामध्ये उपजीविकेचेही नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत आम्हाला आमचे संबंध आर्थिक, हवामान क्षेत्र आणि सुरक्षा या धोरणात्मक युतीच्या पातळीच्या पलीकडे न्यायचे आहेत. अधिकार्‍यांनी सांगितले की, ऊर्जा, व्यापार आणि हवामान बदलासह द्विपक्षीय सहकार्य वाढवणे हे दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत चर्चेच्या अजेंड्यात ठळकपणे आहे.

जयशंकर यांनी केले स्वागत : बैठकीपूर्वी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी बेअरबॅक यांच्या सोबतचा एक फोटो शेअर करून 'भारतात तुमचे स्वागत आहे' असे ट्विट केले. बियरबॉक यांचे सोमवारी भारतात आगमन झाल्यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी देखील ट्विट केले. ते ट्विट मध्ये म्हणतात, "जर्मन परराष्ट्र मंत्री बियरबॉक यांचे नवी दिल्लीतील पहिल्या अधिकृत भेटीवर स्वागत आहे. आमच्या धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेण्याची तसेच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण करण्याची ही सुवर्ण संधी आहे.

भारत-जर्मनी संबंध पूर्वीपासून मजबूत : जर्मनीने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, जयशंकर आणि बियरबॉक यांच्यातील चर्चेत भारताचे चीनशी असलेले संबंध आणि युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा परिणाम यासारखे मुद्दे निश्चितच आहेत. याशिवाय ऊर्जा क्षेत्राबाबतही चर्चा होऊ शकते. भारत आणि जर्मनीने 2021 मध्ये त्यांच्या राजनैतिक संबंधांचा 70 वा वर्धापन दिन साजरा केला. तसेच यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 6व्या इंडो-जर्मन आंतर-सरकारी परिषदेत सहभागी होण्यासाठी बर्लिनला गेले होते. याशिवाय भारताने G7 देशांच्या बैठकीतही सहभागी देश म्हणून भाग घेतला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.