ETV Bharat / bharat

Jet Pack Suit Indian Army : भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढवण्यासाठी सैन्यात जेट पॅक सूट सामील

बदलत्या काळानुसार युद्धाची परिस्थिती बदलत आहे. तंत्रज्ञानात मोठा बदल होत आहे. ज्याच्याकडे चांगले तंत्रज्ञान आहे, तो तितकाच यशस्वी होईल, असा धडा रशिया आणि युक्रेन युद्धाने दिला. भारतही आपल्या लष्कराचे आधुनिकीकरण करत आहे. आता जेट पॅक सूटची संकल्पना विकसित करण्यात आली आहे. या सूटच्या मदतीने आपले सैनिक हवेत उडी मारू शकतात. जेट पॅक सूट म्हणजे काय, वाचा संपूर्ण बातमी.

Jet Pack Suit For Army
भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढवण्यासाठी सैन्यात जेट पॅक सूट सामील
author img

By

Published : Jan 26, 2023, 10:14 AM IST

Updated : Jan 26, 2023, 10:23 AM IST

नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाचे आधुनिकीकरण सुरू आहे. यामध्ये ड्रोन आणि जेट पॅक सूटवर काम वेगाने सुरू आहे. ड्रोनबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. पण जेट पॅक सूट म्हणजे काय याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. भारतीय लष्कराने संवेदनशील सीमा भागात एकूण पाळत ठेवण्यासाठी आणि लढाऊ क्षमता मजबूत करण्यासाठी 130 प्रगत ड्रोन यंत्रणा खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

जेट पॅक सूट : अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'बाय-इंडियन' श्रेणी अंतर्गत जलद-ट्रॅक प्रक्रियेअंतर्गत ड्रोनची खरेदी केली जात आहे. या श्रेणी अंतर्गत, सैन्याने आपत्कालीन खरेदी अंतर्गत 48 जेट पॅक सूट खरेदी करण्यासाठी इच्छुक युनिट्सकडून विनंती पत्र आरपीएफने मागितले आहे. या सूटचे अनेक फायदे आहेत. त्याच्या मदतीने सीमेवर तैनात सैनिक प्रतिकूल परिस्थितीतही उड्डाण करू शकतात. या सूटमध्ये पाच गॅस टर्बाइन जेट इंजिन बसविण्यात आले आहेत. त्याचे इंजिन 1000 अश्वशक्ती निर्माण करते. हे रॉकेल, डिझेल किंवा इतर कोणत्याही इंधनावर चालवता येते. जेट पॅक सूटचा वेग ताशी 50 किमीपर्यंत असू शकतो.

निविदा भरण्याची अंतिम तारीख : टेथर्ड ड्रोन सिस्टीममध्ये ड्रोन असतात, जे जमिनीवर 'टिथर स्टेशन'शी जोडलेले असतात आणि विस्तारित कालावधीसाठी व्हिज्युअल रेंजच्या पलीकडे लक्ष्यांचे निरीक्षण करू शकतात. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रत्येक ड्रोन प्रणालीमध्ये दोन हवाई वाहने, एकल-व्यक्ती पोर्टेबल ग्राउंड कंट्रोल स्टेशन, एक टिथर स्टेशन, एक रिमोट व्हिडिओ टर्मिनल आणि समाविष्ट पेलोडसह इतर घटक असतील. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी आहे. लष्कराने अ‍ॅक्सेसरीजसह 100 'रोबोटिक म्युल्स'ची प्रक्रियाही सुरू केली आहे. 6 फेब्रुवारी ही निविदा भरण्याची अंतिम तारीख असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रोबोट विकसित केला : बॉम्ब शोधणे आणि नष्ट करणारा रोबोट काही दिवसांपूर्वी भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओने भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढवण्यासाठी विकसित केला आहे. लवकरच हा रोबोट भारतीय लष्करात सामील होणार आहे. कॉन्फिंडस्पेस रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल असे या रोबोटचे नाव आहे. 200 ते 500 मीटर अंतरावरूनही या रोबोवर नजर ठेवता येते.रेल्वे स्टेशनसारख्या गर्दीच्या ठिकाणीही हा रोबो आरामात चालवता येतो. रोबोटमध्ये अनेक कॅमेरे असून हा रोबो स्फोटके मानवरहित ठिकाणी नेऊन बॉम्ब नष्ट करू शकतो, अशी माहिती डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Disclaimer : सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ, ईटीव्ही भारत त्याची पुष्टी करत नाही.

हेही वाचा : पेट्रोल पंपावर दोन वर्षांपासून सुरू आहे अमर ज्योती, शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिला जातो संपूर्ण नफा

Last Updated : Jan 26, 2023, 10:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.